Sharad Pawar vs Ajit Pawar esakal
सोलापूर

NCP Crisis : राज्यात मोठा राजकीय भूकंप; शहांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत!

सत्ताधारी पक्षास अजित पवार यांच्या गटाने समर्थन दिल्याने राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असतानाच पवारांचे कार्यकर्ते आम्ही पवाराबरोबर असल्याची सांगत आहेत.

मंगळवेढा : सत्ताधारी पक्षास अजित पवार यांच्या गटाने समर्थन दिल्याने राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. या दुफळीमध्ये मंगळवेढ्यातील रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहत शहा परिवाराच्या तिसऱ्या पिढीचे शरद पवाराबरोबर (Sharad Pawar) सलोख्याचे संबंध ठेवले.

दोन जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत, सत्ताधारी पक्षात सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर इतर आठ आमदार देखील यामध्ये सहभागी झाले.

यावरून राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असतानाच पवारांचे कार्यकर्ते आम्ही पवाराबरोबर असल्याची सांगत आहेत. पवार घराण्यातील दुफळीचे लोण पूर्ण राज्यभर झाले. प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे जुन्या विचारांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार साहेबांबरोबर असल्याचे सांगितले.

या दुफळीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा देखील स्वतः असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवाराबरोबर मंगळवेढ्यातील स्व. रतनचंद शहा होते. मंगळवेढ्याच्या विकासात स्व. रतनचंद शहा यांच्या मागणीनुसार पवारांनी अनेक कामासाठी निधी दिला.

नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली. यापूर्वीच्या मंगळवेढा मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे ठरविण्यासाठी रतनचंद शहा मत विचारात घेत होते. त्यानंतर त्यांचे पुत्र स्व. सुभाष शहा देखील शरद पवाराबरोबर होते.

रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा देखील राष्ट्रवादीबरोबर राजकारणात सक्रिय आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांनीही शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. शहा कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीने शरद पवारांवरील विश्वास कायम राखला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT