Railway
Railway Sakal
सोलापूर

सोलापूर : रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांचा बोनस!

विजय थोरात

सोलापूर - केंद्रातील मोदी सरकारने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. यावर्षी कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मिळणार आहे. सोलापूर विभागांतील जवळपास 9 हजार 500 कर्मचा-यांना 78 दिवसांचा बोनस मिळणार असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रत्येकी 17 हजार 951 रुपये प्रत्येक कर्मचा-यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा होणार आहेत. कोरोनाच्या कठीण काळात केवळ विशेष एक्‍सप्रेस, श्रमिक स्पेशल आणि मालवाहतूक करणा-या गाडया चालविण्यात आल्या आहेत. रेल्वे कर्मचा-यांनी कठीण काळात प्रवाशांना चांगली सेवा दिली. देशातील 11.56 लाख रेल्वे कर्मचा-यांवर 1984.73 कोटी खर्च करणार आहे. दिवाळी बोनस म्हणून 78 दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय बुधवारी ता. 6 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. केंद्र सरकारने रेल्वेच्या कर्मचा-यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली. बोनस मिळणे प्रत्येक कर्म-यासांठी आनंदाची बातमी आहे. कर्मचा-यांना प्रोत्साहित करण्यासाठी बोनसची घोषणा करण्यात आली.

सरकाकडून 78 दिवसांचा वेतनाची रक्कम म्हणून बोनस दिला जाईल, अशी घोषणा केली. भारतीय रेल्वे मधील तृतीय आणि चतुर्थी श्रेणीच्या कामगारांना दिवाळीचा फक्त 17 हजार 951 रुपयांचा बोनस मिळणार आहे. हा बोनस फक्त 78 दिवसांचा असणार आहे. दरवर्षी दस-याच्या पूर्वी बोनसची घोषणा केली जाते. रेल्वेचे कर्मचारी वेतनापेक्षा अधिक काम करतात. त्यामुळे त्यांना जास्त बोनस मिळणे अपेक्षित आहे.

त्याचबरोबर कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या खात्यावर रक्‍कम जमा करण्यात आली असल्याचे यावेळी गुप्ता यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे आदी उपस्थित होते.

ठळक बाबी....

- रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून दिवाळी भेट

- कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांचा बोनस

- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

- बोनसवर सरकार खर्च करणार कोटी रुपये

- 17 कोटी रुपये होणार खर्च

- 9 हजार 500 रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

- रेल्वे कर्मचाऱ्यांना सलग सातव्या वर्षी बोनस जाहीर

- कोरोना काळात विभागांतील 30 कर्मचा-यांचा मृत्यू

बुलेट टेनच्या मार्गात होणार नाही बदल

मागील काही दिवसांपासून मुंबई-हैदराबाद बुलेट टेनच्या मार्गात बदल होणार असल्याची चर्चा आहे. मात्र हा मंजूर झाला तेंव्हा तो मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद हाच मार्ग होता. त्यामुळे यामार्गामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचा अद्याप कोणताही संदेश आमच्यापर्यंत पोहचला नसल्याचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी बोलताना सांगितले.

पॅसेंजर गाडया सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय राज्य सरकारकडून झालेला नाही. त्यामुळे सुरु असलेल्या विशेष एक्‍सप्रेस आणि पॅसेंजर गाडयांमध्ये लवकरच बदल होणार आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या हालचाली वरिष्ठ स्तरावर सुरु आहेत. त्यामुळे येत्या काळात यामध्ये बदल होण्याची दाट शक्‍यता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT