Railway
Railway esakal
सोलापूर

Crime News : रेल्वेत चोरी, छेडछाड प्रकरणी ४१ जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - सोलापूर सुरक्षा विभागाने रेल्वेत चोरी करणारे व छेडछाड करणाऱ्या ४१ जणांवर अटकेची कारवाई केली आहे. तर चालत्या रेल्वेगाडीतून चढ-उतार करताना तोल गेलेल्या सहा पुरुषांचे आणि दोन महिलांचे जीव वाचविले आहेत.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त दीपककुमार आझाद आणि सहायक आयुक्त दिनेश कनोजिया यांच्या देखरेखीखाली रेल्वे सुरक्षा विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात चोरी आणि छेडछाड असे एकूण ३९ घटना झाल्या होत्या. त्यातील ४१ जणांवर अटकेची कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच चालत्या रेल्वेमधून उतरताना आणि चढताना पडणाऱ्या सहा पुरुषांचे आणि चार महिलांचे जीव वाचविण्याचा यश आले. रेल्वेत हरविलेल्या तीन पुरुष आणि सात महिलांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले. यासह रेल्वेची मालमत्ता परत मिळविणे. हरविलेल्या मुलांना सुरक्षितरित्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे कामही सुरक्षा विभागाकडून केले आहे.

१० लाख ६८ हजारांची तिकिटे जप्त

  • रेल्वे आरक्षित तिकीट चोरीचे १५ प्रकरणांमध्ये १७ तिकीट दलालांवर कारवाई करण्यात आली. या दलालांकडे प्रवास न केलेले १ लाख

  • २२ रुपयांची आरक्षित तिकिटे तर प्रवास पूर्ण केलेले ९ लाख ४६ हजार असे १० लाख ६८ हजारांचे तिकिटे जप्त करण्यात आली.

मालमत्ता चोरणाऱ्या १४६ जणांना अटक

वर्षभरात रेल्वे मालमत्तेच्या चोरीच्या एकूण ५० घटना समोर आल्या. १ कोटी १७ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. त्यातून १ कोटी ५१ हजारांचा मुद्देमाल परत मिळविण्यात यश मिळाले आहे. याप्रकरणी १४६ जणांना अटक करण्यात आली आहे.

७५ बालकांना पालकांच्या स्वाधीन

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत घरातून पळालेले, प्रवासात हरविलेले अशा ४६ मुलांना व १९ मुली असे ७५ बालकांचा चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या माध्यमातून सुरक्षित त्यांच्या पालकांना स्वाधीन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: देशातील 'या' राज्यात होत आहे सर्वाधिक मतदान, वाचा दुपारी 1 पर्यंतची आकडेवारी

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT