railway update Pune–Solapur Hutatma Express will run from Monday
railway update Pune–Solapur Hutatma Express will run from Monday  sakal
सोलापूर

सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस सोमवारपासून धावणार

विजय थोरात

सोलापूर : मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील कुरकुंभ मोरी येथील भुयारी पुलाच्या कामासाठी 17 दिवसांसाठी ब्लॉक घेतला होता. या कामासाठी हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आली होती. मात्र हे काम पूर्ण झाल्याने 30 मे पासून हुतात्मा एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेत सोलापूर स्थानकावरून सकाळी 6.30 वाजता सुटणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी'सकाळ'शी बोलताना दिली. दौंड-सोलापूर सेक्शनमध्ये ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेतल्यामुळे सोलापूर विभागाने सोलापूरच्या दिशेच्या बाजूस दौंड यार्डमध्ये सबवे (रोड अंन्डर ब्रीज) बांधण्यासाठी १७ दिवसांसाठी (ता. १३ ते २९ पर्यत) वेगवेगळ्या कालावधी करिता ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता.

ब्लॉकमुळे दोन्ही बाजूच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याने गाड्या उशिराने धावत होत्या. या काळात सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस १७ दिवस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. याकामासाठी २ क्रेन, जेसीबी, आणि २५० कर्मचारी रोज पाच तास करीत आहेत. २६, २७ मे दरम्यान ७ तासांच तर २८ आणि २९ मेदरम्यान सहा तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. दौंड स्थानक येथील फलाट क्रमांक १ ते ४ पूर्णत: बंद ठेवण्यात आले होते तर बारामती, पुणेच्या दिशेने येणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. ता. २९ मे रोजी दुपारी दोनवाजेर्पंत काम पूर्ण करण्यात आले असून, यानंतर म्हणजे 30 मेपासून सर्व गाड्या पूर्ववत होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दौंड सोलापूर सेक्शन मध्ये कुरकुंभ मोरे येथे भुयारी पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला होता भुयारी पुलाचे काम पूर्ण झाले असून हुतात्मा एक्सप्रेस 30 मे पासून आपल्या निर्धारित वेळेत धावणार आहे इतरही गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेत पूर्ववत धावणार आहेत.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापुर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT