rain
rain 
सोलापूर

जूनमध्ये पावसाने केली सरासरी पूर्ण 

प्रमोद बोडके

सोलापूर : गेल्या काही वर्षांपासून कधी दुष्काळ, कधी अवकाळी तर गारपिटीचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाचा पावसाळा चांगला ठरत आहे. यंदा पावसाळ्यापूर्वीच लॉकडाऊनचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर आले. या सर्व संकटावर मात करूनही बळिराजा खरिपाच्या तयारीला लागला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

जूनमध्ये सोलापूर जिल्ह्यात सरासरी 198.6 मिली मीटर पाऊस होतो. यावर्षी 200.9 मिली मीटर पाऊस झाला आहे. जूनमधील सरासरीच्या 101.2 टक्के पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात रोहिणी, मृग, आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात जूनच्या पावसाची सरासरी पूर्ण झाली आहे. जुलैमध्ये सोलापूर जिल्ह्यात 126.7 मिली मीटर सरासरी पाऊस होतो. जुलैमध्ये आतापर्यंत 77.6 मिली मीटर पाऊस झाला आहे.

जुलैमध्ये होणाऱ्या एकूण सरासरी पावसाच्या 61.2 टक्के पाऊस झाला आहे. सध्या सुरु असलेल्या पुनर्वसू नक्षत्रात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. 19 जुलैला सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश होत आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. हत्ती वाहन असल्याने मुसळधार पाऊस पडत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. 

खरिपाच्या पिकांवरच शेतकऱ्यांची दिवाळी अवलंबून असल्याने शेतकऱ्यांसाठी खरीप महत्त्वाचा मानला जातो. गेल्या वर्षी पावसाने जुलैनंतर मोठी ओढ दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप वाया गेला होता. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार सध्या तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT