Solapur
Solapur  Sakal
सोलापूर

Solapur : राजन पाटलांचे उमेश पाटील यांना 'ओपन चॅलेंज';पाटलांमधील वादाच्या ठिणग्या पडणे चालूच !

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : वादग्रस्त वक्तव्यानंतर माजी आमदार राजन पाटील हे आज सोलापुरात पहिल्यांदाच प्रसारमाध्यमन समोर आले. पत्रकार परिषदेतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि त्यांचे कट्टर राजकीय दुश्मन उमेश पाटील यांना 'ओपन चॅलेंज' दिले आहे. राजन पाटील यांनी उमेश पाटलांना ओपन चॅलेंज दिल्याने दोघा पाटलांमधील वाद पेटताच राहणार हे उघड आहे.

राजन पाटील यांनी उमेश पाटील यांना आव्हान देताना, उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातून कुठूनही निवडणुकीत उभे राहावे असे ओपन चॅलेंज दिले आहे. वास्तविक असे चॅलेंज यांनी राजन पाटील परिवाराला यापूर्वीच दिले आहे. राजन पाटील परिवारातील कोणतीही आपल्या विरोधात, निवडणुकीत उभे ठाकावे, असे ते उमेश पाटील यांचे आव्हान आहे, त्यावर पुन्हा आज राजन पाटील यांनी आव्हान दिले आहे.राजन पाटील यांच्या ओपन चॅलेंज वर आता उमेश पाटील हे काय उत्तर देणार, ओपन चॅलेंज स्वीकारणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष राहणार आहे.

उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीला उभं राहावं. त्या ठिकाणी आपण ताकद बघू, ही ताकद वर्क्तृत्वात नसते, तर कर्तृत्वात असते. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी कुठल्यातरी निवडणुकीला उभं राहावं. त्यांच्या विरोधात मी माझ्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी देणार नाही, तर माझा सर्वसामान्य कार्यकर्ता लढेल, अशा शब्दांत मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजन पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांना आव्हान दिले.

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विधानावर स्पष्टीकरण देण्यासाठी माजी आमदार पाटील यांनी आज (ता. १८ नोव्हेंबर) सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उमेश पाटील यांच्याकडून होणाऱ्या टीकेबाबत विचारले असते, त्यांनी वरील माहिती दिली.

पाटील म्हणाले की, उमेश पाटील यांना मी मोहोळ तालुक्याची ओळख करून दिली आहे, त्यांना तालुक्यातील एकही कार्यकर्ता ओळखत नव्हता. पण, मनोहरभाऊ डोंगरेंसारखे पक्षाचे चांगले कार्यकर्ते माझ्यापासून दूर गेले होते, त्यावेळी माझी मानसिकता थोडी खचली होती. आपला आमदार निवडून आणू की नाही, असे वाटते होते, त्यामुळे बेरजेचे राजकारण करण्यासाठी मी उमेश पाटील यांना नरखेडमधून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती

आमच्या मोहोळ तालुक्यातील मुलगा आहे; म्हणून मी उमेश पाटील यांना मुंबईत ओळखत होतो. उमेश पाटील यांचे वडिल हे आमचे वडिल बाबूराव पाटील यांचे कार्यकर्ते होते. शहाजीराव पाटील यांच्या विरोधातील ही माणसं आहेत. सोलापूर जिल्हा बॅंकेत असताना मला भेटायला उमेश पाटील आले होते. त्यावेळी मला म्हणाले की, ‘जरा बोलायचं आहे.’ उमेश पाटील यांना मी सर्वांसमोरच बोलण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी आपण जिल्हा परिषदेला नरखेडमधून इच्छूक असल्याचे सांगितले होते. त्यावेळी नरखेड खुला झाला होता, असेही पाटील यांनी नमूद केले.

राजन पाटील म्हणाले की, मला माझी राष्ट्रवादी मोहोळ तालुक्यात सांभाळयाची होती. मला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये रस नव्हता. माझा इंटरेस्ट आमदारकीमध्ये होता. शरद पवारांचा उद्याचा उमेदवार निवडून द्यायचा होता. माझ्यापासून मनोहरभाऊंसारखे पक्षाचे चांगले कार्यकर्ते दूर गेले हेाते. त्यावेळी माझी मानसिकता थोडी खचली होती. कदाचित यावेळी आमपण आमदार निवडून आणू की नाही, असे मला वाटत होते. म्हणून बरेजचे राजकारण करण्यासाठी नरखेड मतदारसंघ निवडून आणण्यासाठी आणि आमच्या उमेदवाराला जरा अडचण असल्यामुळे त्यांनी निवडणुकीस नकार दिला होता. त्यामुळे उमेश पाटील यांना मी जिल्हा परिषदेचे तिकिट दिले होते.

माझ्यावर टीका केली की...

उमेश पाटील सध्या असं का वागत आहेत, ते मी कसं सांगणार आहे. मी काय पवारसाहेबांएवढा नाही. पण, जसं पवारांवर टीका केली की मीडियात झळकतंय, तसं मोहोळ तालुक्यात माझ्यावर टीका केली की... असं त्यांना वाटत असेल, असं टोमणाही त्यांनी उमेश पाटील यांना लगावला.

राष्ट्रवादीने माझ्यावर मोठा विश्वास टाकलाय

मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीने आजपर्यंत एकही तिकिट पक्षाचे मर्जीने दिलेले नाही. अगदी आमदारकीचंसुद्धा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर एवढा विश्वास दाखवला आहे.

शिवाजी भोसले उपसंपादक सकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT