rajendra Raut invitation to Rajan Patil to join BJP politics solapur
rajendra Raut invitation to Rajan Patil to join BJP politics solapur sakal
सोलापूर

Solapur News :राऊतांचे राजन पाटलांना थेट भाजप प्रवेशाचे निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ : बार्शीचे भाजपचे सहयोगी आमदार राजेंद्र राऊत यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना भाजप प्रवेशाचे थेट आमंत्रण दिल्याने पाटील कुटुंबीयांच्या भाजप प्रवेशाच्या बंद झालेल्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या निमंत्रणावरून आमदार राऊत यांनी पेनूर (ता. मोहोळ) मो येथील एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार पाटील उपस्थित होते. त्यांना उद्देशून बोलताना आमदार राऊत यांनी विकास कामाचा हवाला देत, मार्गदर्शनाची गरज व्यक्त करीत, माजी आमदार पाटील यांनी आता थेट निर्णय घेऊन भाजप प्रवेश करावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या वेगळ्या वाटेवर चालला आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशाचे नाव जागतिक पातळीवर क्रमांक एकवर नेऊन ठेवले आहे. विकासाचा वारू मोहोळ तालुक्यात चौफेर उधळण्यासाठी माजी आमदार पाटील यांच्यासारख्या मार्गदर्शक नेत्याने विकासाच्या प्रवाहात सामील होण्याची अपेक्षा आमदार राऊत यांनी व्यक्त करीत पाटील कुटुंबीयांनी भाजपत प्रवेश करावा असे थेट निमंत्रण दिले.

गेल्या वर्ष भरापासून माजी आमदार पाटील आणि त्यांच्या चिरंजीवांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांमध्ये गेल्या महिन्याभरापूर्वी खंड पडला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या छब्या झळकल्याने पाटील परिवाराच्या भाजपच्या चर्चा थांबल्या होत्या.

मात्र, आता पेनूर येथील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याच्या आग्रहावरून आमदार राऊत यांनी मोहोळ तालुक्यात हजेरी लावली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा हा कार्यकर्ता पाटील कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचा मानला जातो. पाटील कुटुंबीयांच्या सल्ल्यानेच त्या कार्यकर्त्याने आमदार राऊत यांना निमंत्रण दिले असल्याची चर्चा तालुक्यात आहे.

आमदार राऊत यांचा मोहोळ तालुक्यातील हा दौरा म्हणजे पाटील कुटुंबीयांच्या भाजप प्रवेशापूर्वीची मशागत असल्याची चर्चा आता रंगली आहे. थेट भाजपत प्रवेश करून कार्यकर्त्यांना धक्का देण्यापेक्षा आमदार राऊत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन कार्यकर्त्यांची पक्ष बदलाबद्दलची मानसिकता तयार करण्याच्या प्रक्रियेचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे.

राऊत यांनी जबाबदारी निभावली; पाटील

दरम्यान, या संदर्भात माजी आमदार राजन पाटील यांच्याशी संवाद साधला असता, प्रत्येक जण आपल्या पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत असतो. तोच प्रयत्न आमदार राऊत यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी मला निमंत्रण देऊन त्यांची जबाबदारी निभावली आहे, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT