Ramadan Eid prayers should be offered at home 
सोलापूर

रमजान ईदची नमाज घरातच अदा करावी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : रमजान ईदची नमाज घरामध्येच अदा करावी, असे आवाहन शहर काझी सय्यद अमजद अली काझी यांनी केले आहे. आज जगामध्ये कोरोनामुळे थैमान सुुरु आहे. लाखो लोकांना त्रास होत आहे. कोरोना जगातून हद्दपार व्हावा अशी प्रार्थना अल्लाला करूयात. कोरोनामुळे जे बाधित झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी दुवा करू यात, असेही ते म्हणाले. 

सध्या महाराष्ट्र व सोलापुरात लॉकडाऊन सुरु आहे. रमजानच्या कालावधीत ध्वनीक्षेपकावरून नमाज अदा करण्याची परवानगी आम्ही प्रशासनाकडे मागितली आहे. त्यासंदर्भात काय निर्णय होतो हे कळाल्यानंतर त्याची माहिती देण्यात येईल, असेही श्री. काझी यांनी म्हटले आहे. 

समाजातील धनवान बांधवांनी यंदा आपली जकात देताना गरजवंतांना देण्याला प्राधान्य द्यावे. विशेषतः कोरोनामुळे अडचणीत असलेले तसेच गोरगरीब जनतेला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री. काझी यांनी म्हटले आहे. समाजातील सर्व वडिलधारी मंडळींनी आपल्या घरातील तरुण या कालावधीत बाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच सोशल डिस्टस्निंगचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन काझी यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

चार दिवसांनी निर्माण होणारा गजकेसरी योग 'या' चार राशींना करणार मालामाल ! आनंदाचे दिवस होणार सुरू

Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT