गणपतराव आबांची अपूर्ण कामे रिपब्लिकन पक्ष पूर्ण करणार : रामदास आठवले Canva
सोलापूर

गणपतरावआबांची अपूर्ण कामे रिपब्लिकन पक्ष पूर्ण करणार : रामदास आठवले

गणपतराव आबांची अपूर्ण कामे रिपब्लिकन पक्ष पूर्ण करणार : रामदास आठवले

दत्तात्रय खंडागळे

शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रामदास आठवले सांगोल्यात आले होते.

सांगोला (सोलापूर) : गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) हे संपूर्ण महाराष्ट्रात चाणाक्ष, अभ्यासू असणारे व सर्व क्षेत्रांमधील जाण असणारे नेते होते. त्यांच्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला फार मोठा गौरव होता. गणपतराव आबांचे अपूर्ण राहिलेले काम रिपब्लिकन पक्ष (Republican Party of India) पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, अशा भावना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी व्यक्त केल्या. शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आज बुधवारी (ता. 18) रामदास आठवले सांगोल्यात (Sangola) आले होते. देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या भेटीवेळी आबांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख, नातू बाबासाहेब देशमुख, रतनकाकी देशमुख आदी उपस्थित होते. प्रारंभी आठवले यांनी कै. गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

रामदास आठवले पुढे म्हणाले, गणपतराव देशमुख यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला फार मोठा गौरव होता. जवळजवळ अकरा वेळा ते विधानसभेत निवडून आले होते. त्यांनी विधानसभेत शेतकऱ्यांसाठी, दलितांसाठी व पाण्याच्या प्रश्नासाठी मोठा लढा देऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला होता. गणपतराव आबांचे आणि माझे वैयक्तिक अतिशय चांगले संबंध होते. 1999 व 2004 साली पंढरपूर लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी माझ्यासाठी मोठे मताधिक्‍य तालुक्‍यातून मिळवून दिले होते. पहिल्या वेळेला जवळजवळ सव्वा लाखाचे मताधिक्‍य एकट्या सांगोल्यामधून मला मिळाले होते. त्यांच्याबद्दल मला फार मोठा आदर होता. शेवटपर्यंत ते जनतेच्या कामासाठी कार्यरत राहिले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये मी रिपब्लिकन पक्ष, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंत्री या नात्याने आदरांजली वाहतो व त्यांचे अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, असेही शेवटी आठवले म्हणाले.

या वेळी त्यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव राजा सरवदे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष बापुसाहेब बनसोडे, तालुका अध्यक्ष खंडू सातपुते, नगरसेवक सूरज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अंबर काटे, दिगंबर गवळी, जिल्हा चिटणीस राजा मागाडे, शहराध्यक्ष सतीश काटे, धर्मा भडंगे, मातंग आघाडीचे तालुकाध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर, सुरेंद्र ढोबळे, तेजस आढाव, सूरज होवाळ, नवा सरतापे, पिंटू सरतापे, दत्ता सावंत, गौतम चंदनशिवे, अर्जुन लांडगे, सखाराम लांडगे, गौतम जगधने, सौदागर सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT