Ramesh Baraskar of Mohol will direct nomination for Madha Lok Sabha solapur politics sakal
सोलापूर

Lok Sabha Election: माढा लोकसभेसाठी मोहोळचे रमेश बारसकर यांनी मागीतली थेट उमेदवारी

माढा लोकसभा मतदारसंघ सर्वात जास्त चर्चेत

राजकुमार शहा

मोहोळ : येत्या लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून, अनेक इच्छुकांनी आपापल्या गॉडफादर करवी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघ सर्वात जास्त चर्चेत असून, या मतदार संघातून लढवणूक लढविलेले खा शरद पवार यांच्याकडे मोहोळ चे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी उमेदवारी मागितली आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बारसकर म्हणाले, माढा हा 841 गावे समाविष्ट असलेला मतदार संघ आहे. खास माढा लोकसभा मतदार संघासाठी गेल्या दोन दिवसापूर्वी मुंबई येथे राष्ट्रवादी (शरद पवार गट) ची बैठक आयोजित केली होती.

त्यात अनेक विषयावर व आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. त्या बैठकीत आपण थेट उमेदवारीची मागणी केली. या मतदार संघात ओबीसी ची ताकद मोठी आहे.

मराठा, धनगर यांच्या पाठोपाठ अडीच लाख माळी समाज आहे. भाजपाने या अगोदर जनतेच्या जीवावर निवडणूक लढविली आहे. आता राष्ट्रवादी कार्यकर्ते व मतदार यांच्या जीवावर ही निवडणूक लढविणार आहे.

विधानसभेच्या 288 आमदारांपैकी इंदापूरचे दत्तात्रय भरणे हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. मी राष्ट्रवादीचा पक्ष निरीक्षक असल्यामुळे अनेक भागाचा माझा संपर्क आला आहे. तर ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संपर्क आला आहे.

खा पवार हे बुद्धिबळातील राजे आहेत. राजाने आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. मला संधी दिली तर भूमिपुत्राला संधी दिल्या सारखे होईल. सध्या सर्वत्र जातीचे राजकारण सुरू आहे हे सर्वश्रुत आहे. या वेळी मंगेश पांढरे, शीलवंत क्षीरसागर आदी सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT