Lok Sabha Poll  Sakal
सोलापूर

Lok Sabha Poll : नाईक-निंबाळकर उद्या करमाळा दौऱ्यावर; आमदार शिंदे, जगताप, रश्मी बागल येणार एकाच व्यासपीठावर

माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळा तालुक्याच्या विविध भागात २२ व २३ एप्रिल दोन दिवस सभा व मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळा तालुक्याच्या विविध भागात २२ व २३ एप्रिल दोन दिवस सभा व मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.सावडी (ता. करमाळा) येथून सोमवारी (ता. २२) त्यांच्या दौऱ्याला सुरवात होणार आहे.

तालुक्यातील सावडी, करमाळा, साडे, कंदर, चिकलठाण, येथे प्रचार सभा होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजपच्या रश्मी बागल एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याप्रसंगी ‘महायुतीमधील भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट), रासप, आरपीआय (ए), रयत क्रांती यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.

यावेळी करमाळा शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले जाणार आहे. सोमवारी सावडी येथील नवीन मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत सभा होणार आहे. यावेळी कोर्टी व केत्तूर गणातील गावांमधील नागरिक उपस्थित राहणार आहेत.

दुपारी २ ते ५ यावेळेत करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात होणाऱ्या सभेला करमाळा शहरासह पांडे, रावगाव व वीट गणातील गावातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ ते १० यावेळेत बाईक रॅली निघणार आहे.

मंगळवारी (ता. २३) सकाळी ९ ते १२ या वेळेत कंदर येथील साई कृपा मंगल कार्यालय येथे सभा होणार आहे. त्यानंतर २ ते ५ या वेळेत साडे येथील कोटीलिंग मंगल कार्यालय येथे सभा होणार आहे. साडे व कुंभेज गणातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ ते ९ यावेळेत चिखलठाण येथील श्रीनाथ मंगल कार्यालय येथे सभा होणार असून जेऊर व चिखलठाण भागातील नागरिक उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT