Re examination of Urdu students will be held Sakal
सोलापूर

‘उर्दू’ विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा

उत्तरासह मिळाली होती प्रश्‍नपत्रिका; विद्यापीठाकडून पाच सदस्यीय कमिटी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सध्या सुरू आहे. त्यात उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या हस्तलिखित प्रश्नपत्रिकेत प्रश्नांखालील योग्य पर्यायावर पूर्वीच्याच खूणा आढळून आल्या आहेत. त्याच्या चौकशीसाठी आता विद्यापीठाने पाच सदस्यीय समिती नेमली असून, ‘त्या’ २० विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

विद्यापीठाने जूनच्या सुरवातीला परीक्षा घेण्याचे केलेले नियोजन आषाढी वारीमुळे पुढे ढकलले. २० जूनपासून परीक्षा होईल, असे स्पष्ट केल्यानंतर वर्णनात्मक परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. पण, विद्यार्थ्यांसह काही संघटनांनी विद्यापीठात आंदोलन केले आणि त्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत कुलगुरूंना तशा सूचना दिल्या. त्यामुळे विद्यापीठाने अचानक निर्णय बदलून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. पण, अचानक केलेल्या या बदलामुळे दहा दिवसांत ८० हजार विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका देण्याचे आव्हान विद्यापीठासमोर उभे राहिले.

परीक्षा आणखी पुढे गेल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल म्हणून विद्यापीठाने तातडीने प्रश्नपत्रिकांची सोय केली. त्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) व उर्दू माध्यमाची प्रश्नपत्रिका हस्तलिखित दिली. प्रश्नपत्रिका गोपनीय असल्याने आणि विद्यापीठाकडे त्या दोन्ही विषयांच्या टायपिंगची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना सुस्पष्ट हस्ताक्षरात लिहिलेल्या प्रश्नपत्रिका दिल्या. परंतु, ‘आयटी’च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकीचे होते तर उर्दूच्या प्रश्नपत्रिकेत उत्तरांवर पूर्वीच खुणा केल्याची तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झाली. त्यानुसार विद्यापीठ आता त्याची चौकशी करीत आहे. हुशार, होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका परीक्षा विभागाची आहे.

बीई, बी-टेकचा निकाल दोन दिवसांत

अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकजण पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर जातात. या पार्श्वभूमीवर बीई व बी-टेकची परीक्षा सुरवातीला पार पडली. आता त्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल काही दिवसांत विद्यापीठाने तयार केला असून, तो गुरुवार-शुक्रवारपर्यंत जाहीर होणार आहे.

उर्दू माध्यमाच्या २० विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकांवरील उत्तराच्या पर्यायावर खुणा होत्या. संबंधिताला पाच सदस्यीय समितीसमोर बोलावण्यात आले आहे. त्यानंतर समितीच्या निर्णयानुसार पुढील निर्णय होईल. तत्पूर्वी, काही विद्यार्थ्यांनी वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकांवरील उत्तरांना खुणा केल्याचेही निदर्शनास आले असून, त्याचीही चौकशी सुरू आहे.

- डॉ. शिवकुमार गणापूर, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Latest Marathi News Live Update: पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

SCROLL FOR NEXT