Solapur Zillaparishad sakal
सोलापूर

Solapur Zillaparishad : गुणवंत कर्मचाऱ्यासाठी चार प्रस्ताव प्राप्त

जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये (पंचायत समित्यांसह) उत्कृष्ट काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला शासनातर्फे गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मानित केले जाते.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये (पंचायत समित्यांसह) उत्कृष्ट काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला शासनातर्फे गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मानित केले जाते. २०२१-२२ या वर्षातील गुणवंत कर्मचारी निवडण्याची कार्यवाही सध्या सुरू असून आतापर्यंत चौघांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत, शिक्षण, वित्त व लेखा, सामान्य प्रशासन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य, बांधकाम अशा विविध विभागांमध्ये अंदाजे दीडशेहून अधिक कर्मचारी आहेत. तालुका पंचायत समित्यांमध्येही चारशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

शासनाच्या आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्याने दैनंदिन कामाशिवाय सामाजिक बांधिलकीतून किंवा इतरही कौतुकास्पद कामे केली आहेत, त्याचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. पण, त्यासाठी त्या कर्मचाऱ्यानेच स्वत:हून प्रस्ताव देणे अपेक्षित आहे.

आतापर्यंत चौघांनी प्रस्ताव दिले असून मंगळवारी (ता. २०) त्यात एक-दोन प्रस्ताव वाढू शकतात. पण, मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक होऊन एकाचे नाव अंतिम होणार आहे. त्या कर्मचाऱ्याचे नाव विभागीय स्तरावर पाठविले जाईल. कोणाकडून तरी शिफारस आली म्हणून किंवा कोणी राजकीय व्यक्तीने सांगितले म्हणून गुणवंत कर्मचारी हाच असे होत नाही. त्या कर्मचाऱ्याचे काम पाहूनच त्याला गुणवंत कर्मचारी म्हणून शासनाकडून गौरविले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात भूकंप, 'या' कंपन्यांचे शेअर्स गडगडले

Manoj Jarange Patil: सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन: मनोज जरांगे पाटील, सात तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित!

Sahyadri tiger reserve update : ‘सह्याद्री प्रकल्प’मध्ये ‘शिलेदार’ची एन्ट्री, ‘तारा’सोबत जमणार का जोडी? निसर्गप्रेमींसाठी उत्सुकता

Israel-Iran war: इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT