सोलापूर

budget2020 : `या` महापालिका परिवहन उपक्रमाच्या खासगीकरणाची शिफारस 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : वर्षानुवर्षे तोट्यात असलेल्या महापालिका परिवहन उपक्रमाचे खासगीकरण करावे, सुमारे 100 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती द्यावी, या प्रमुख शिफारशींचा समावेश असलेले 103 कोटी 34 लाख नऊ हजार 331 रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक प्रभारी परिवहन व्यवस्थापक श्रीशैल लिगाडे यांनी सोमवारी परिवहन समितीचे सभापती गणेश जाधव यांच्याकडे सादर केले. 

कार्यशाळा उभारण्याची शिफारस 
अंदाजपत्रकाच्या उत्पन्न विभागात बसभाड्यापासून 11 कोटी 95 लाख 50 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. याशिवाय जाहिरातीपासून 24 लाख रुपये, तर इतर बाबींपासून चार कोटी 63 लाख 64 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. खर्च विभागामध्ये 74 कोटी 70 लाख चार हजार 331 रुपये अपेक्षित असून, देखभाल व दुरुस्तीसाठी पाच कोटी 63 लाख 60 हजार रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. भांडवली निधीतून सात कोटी रुपये अपेक्षित असून, त्या खर्चातून बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी कार्यशाळा उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

60 बसगाड्या मार्गावर आणण्याचे नियोजन
आगामी वर्षात 60 बसगाड्या मार्गावर आणण्याचे नियोजन असून, त्यासाठी कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. परिवहन उपक्रमाच्या ऊर्जितावस्थेसाठी 63 कोटी 50 लाख रुपयांची गरज आहे. ही रक्कम महापालिकेने उपलब्ध करून द्यावी, उपक्रम एसटी महामंडळाकडे वर्ग करावा, या दोन्ही बाबी शक्‍य नसतील तर परिवहन उपक्रमाचे खासगीकरण करावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Courses Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर १० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Gangapur News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; गंगापूरमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT