Record corona affected in a single day in Pandharpur taluka 229 reported positive
Record corona affected in a single day in Pandharpur taluka 229 reported positive 
सोलापूर

पंढरपूर तालुक्‍यात एकाच दिवशी विक्रमी कोरोनाबाधित; 229 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर व तालुक्‍यात आज तब्बल 229 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे पंढरपूरकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 980 वर पोचली आहे. 
पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ती रोखण्यासाठी शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात आरोग्य विभागाने रॅपिड अटिजेन टेस्ट वाढवल्या आहेत. 
यामध्ये शहर व ग्रामीण भागात आज एकाच दिवसात विक्रमी 229 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. एकाच भोसे गावात 15 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या शिवाय गोपाळपूर, खेडभोसे, मुंडेवाडी, पिराचीकुरोली, रोपळे, लक्ष्मीटाकळी येथेही नवीन रुग्ण सापडले आहेत. पंढरपूर शहरातील अनिल नगर, काशीकपडे गल्ली, कालिकादेवी चौक, लिंकरोड या नवीन भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आज पंढरपुरात एका 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. शहरात आतापर्यंत 22 जणांचा बळी गेला आहे. शहर व तालुक्‍यातील 415 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 565 जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांनी दिली. 

नागरिकांनी सुचनांचे पालन करावे : आमदार भालके 
पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी सुचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले आहे. तालुक्‍यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रशासनाच्या वतीने मोफत रॅपिड अँटीजेन टेस्टची मोहीम सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. कोरोना विषाणुच्या आजाराबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार दक्षता घ्यावी. आजाराबाबत कुठलीही माहिती लपवू नये. स्वत:ची व कुटूंबाची तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असेही आमदार भालके यांनी सांगितले. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT