झेडपी अध्यक्ष कांबळे म्हणतात, पंढरपूर जिल्ह्याचा ठराव मजेत झाला! Canva
सोलापूर

झेडपी अध्यक्ष कांबळे म्हणतात, पंढरपूर जिल्ह्याचा ठराव मजेत झाला !

झेडपी अध्यक्ष कांबळे म्हणतात, पंढरपूर जिल्ह्याचा ठराव मजेत झाला! इतर सदस्य आक्रमक

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

अखेर गेल्या आठवड्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पंढरपूर जिल्हा निर्मितीचा ठराव झाला.

सोलापूर : नाही-होय, नाही-होय म्हणत अखेर गेल्या आठवड्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad, Solapur) सर्वसाधारण सभेत पंढरपूर (Pandharpur) जिल्हा निर्मितीचा ठराव झाला. सदस्य सचिन देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला पंढरपूर तालुक्‍यातील सदस्य वसंत देशमुख यांनी अनुमोदन दिले. सोमवारी या विषयासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे (Aniruddha Kambale) यांना विचारले असता त्यांनी अजबच उत्तर दिले, म्हणे "पंढरपूर जिल्हा निर्मितीचा विषय म्हणजे मजेत झालेला विषय आहे. तो ठराव करायचा का नाही? याबाबत विचार करावा लागेल.' जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी पंढरपूर जिल्हा निर्मितीच्या ठरावाबाबत विचित्र भूमिका घेतल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मजेमजेत देखील ठराव होतात, ही बाब आता समोर आली आहे.

जिल्हा परिषदेतील काही सदस्यांनी पंढरपूरला सोलापूरपासून तोडण्याची भाषा करणाऱ्याला आमचा विरोध असल्याचे सांगितले. स्वतंत्र तालुक्‍याचा निर्णय होत नाही तर जिल्हा निर्मितीचा विषय कसा मार्गी लागेल, असा प्रश्‍न भाजपचे सदस्य आनंद तानवडे यांनी उपस्थित केला आहे. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी यासंदर्भात सावध भूमिका घेतली आहे. त्या ऑनलाइन सभेला जॉईन होण्यासाठी आपल्याला उशीर झाला, त्यामुळे काय झाले हे समजले नसल्याचे सांगून या विषयातून त्यांनी अंग काढून घेतले.

म्हणून होता ऑफलाइन सभेचा आग्रह

जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ होतो. कोण काय बोलते? हे कळत नाही. अचानक रेंज गायब होते. त्यामुळे सभेत नक्की कोण काय बोलले आणि कशाचा ठराव झाला हे कोणालाही समजत नाही. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घ्या, अशी मागणी काही सदस्यांनी वारंवार केली होती. ऑफलाइन आणि ऑनलाइन सभेतून काय गैरसमज होऊ शकतात आणि कसा संभ्रम निर्माण होऊ शकतो, याचे चांगले उदाहरण म्हणून सध्या पंढरपूर जिल्हा निर्मितीच्या विषयाकडे पाहिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT