सोलापूर

राज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी ! 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: महात्मा गांधी तंटामुक्‍त अभियान सैल झाल्यानंतर गावातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणारे गावचे पोलिस पाटीलच मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. तत्कालीन सरकारने मानधनवाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार दोनवेळा वाढीव मानधन मिळाले, मात्र ऑगस्टपासून त्यांना मानधनाचा दमडाही मिळालेला नाही. त्यामुळे स्वत:च्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीच त्यांना रोजगार शोधावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्चपासून आता त्यांना नियिमत वेतन मिळेल, असे ठोस नियोजन गृह विभागाने केले आहे. 


राज्यभरात 27 हजार 120 पोलिस पाटील कार्यरत असून त्यांना दरमहा प्रत्येकी सहा हजार 500 रुपयांप्रमाणे मानधन द्यावे लागते. पोलिस पाटलांसह कोतवालांचा वाढीव मानधनासाठी संघर्ष सुरू असतानाच आता त्यांना नियमित मानधनासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून प्रस्ताव सादर करूनही अद्याप पोलिस पाटलांना मानधन मिळालेले नाही. पोलिस प्रशासनावरील कामाचा ताण कमी व्हावा, गावातील भांडण, तंटे गावातच मिटावेत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिस पाटलांना मानधनासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या पोलिस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडावे लागत आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाने मानधनाचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयास सादर केला आहे, परंतु निधीअभावी मानधन मिळालेले नाही. मार्चपासून नियमित मानधन मिळेल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनीही व्यक्‍त केला आहे. 


मानधन वाढविले पण तरतूदच नाही 
तत्कालीन युती सरकारच्या काळात पोलिस पाटलांच्या मानधनवाढीच्या लढ्याला यश मिळाले. दरमहा साडेतीन हजार रुपये मिळणारे मानधन सहा हजार 500 रुपये झाले. मात्र, दोनवेळा वाढीव मानधन मिळाले आणि ऑगस्टपासून मानधनवाढही नाही अन्‌ नियमित मानधनही मिळाले नाही. मानधनवाढ केल्याने सर्व अनुदान ऑगस्टमध्येच संपले. त्यामुळे आता मार्चच्या अर्थसंकल्पात या वाढीव मानधनाची तरतूद केली जाणार आहे. त्यानंतर पोलिस पाटलांना नियमित मानधन मिळेल, असे नियोजन आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT