Todphod
Todphod 
सोलापूर

प्रसूतीनंतर महिलेचा गेला जीव ! डॉक्‍टरकडूनच कमीजास्त झालं म्हणून नातेवाइकांनी फोडले हॉस्पिटल

अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : वेळापूर (ता. माळशिरस) येथील नाईक हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होमवर रविवारी (ता. 31) रुग्णाच्या नातेवाइकांनी हल्ला करून हॉस्पिटलमधील वस्तूंची तोडफोड केली. यामध्ये हॉस्पिटलचे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याची फिर्याद डॉ. उमेश नाईक यांनी वेळापूर पोलिसात दाखल केली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, की बुधवारी (27 डिसेंबर) नाईक हॉस्पिटलमध्ये पायल अनिल मगर (वय 19, रा. गारवडख ता. माळशिरस) या महिलेचा प्रसूतीनंतर अचानक तब्येत बिघडल्याने अकलूज येथे उपचाराला नेताना तिचा मृत्यू झाला होता. या मृत्यूस डॉ. नाईक दाम्पत्य जबाबदार आहेत, अशी तक्रार मृत महिलेच्या माहेरील नातेवाइकांनी दाखल केली आहे. 

त्याचा पोलिस तपास सुरू असतानाच रविवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मृत महिलेच्या उघडेवाडी (ता. माळशिरस) येथील माहेरच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून हातातील दगड व काठ्यांनी हॉस्पिटलच्या काचा, दरवाजे, खुर्च्या, टेबल, मशीन, बाकडे, फर्निचर आदींची मोडतोड व नासधूस केली. डॉक्‍टरांना जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. डॉक्‍टरांच्या राहत्या घरामध्ये घुसून रोख रकमेसह काही ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद रोहित अशोक थोरात, राहुल विजय थोरात, अशोक रामचंद्र थोरात आणि प्रशांत कृष्ण सावंत (सर्वजण रा. उघडेवाडी, ता. माळशिरस) या चौघां विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळी हॉस्पिटलच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपी चारचाकीतून पलायन करताना ताब्यात घेतले. रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवणे आणि घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम वेळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव आणि कर्मचाऱ्यांकडून सुरू होते. 

या घटनेनंतर गेली वीस वर्षे वेळापूर परिसरात अखंड आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्‍टरांवर अशी वेळ आल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. 27 तारखेला रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्‍टरांच्या मागणीवरून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नाईक हॉस्पिटलला पोलिस संरक्षण पुरवले असताना, पोलिसांसमक्ष हॉस्पिटलवर आणि डॉक्‍टरांवर हल्ला करून मोठी नासधूस केल्याने नागरिकांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्‍टरांवरील हल्ले अलीकडे वाढत चालले आहेत. समाजाच्या या मानसिकतेमुळे प्रसूती रुग्ण आणि अत्यवस्थ, तातडीच्या उपचाराची गरज असणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घ्यावे की नाही, हा यक्षप्रश्न डॉक्‍टरांपुढे निर्माण झाला आहे, अशा प्रतिक्रिया डॉक्‍टरांकडून पुढे येत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT