velapur police.png 
सोलापूर

रोजीरोटी अभावी संकटग्रस्त ग्रामस्थांना खाकी वर्दीतील माणुसकीचा दिलासा ! वाचा सविस्तर 

अशोक पवार

वेळापूर(सोलापूर): वेळापूर गावामधील एका वसाहतीमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीच्या तपासण्या झाल्या. या तपासण्यांमध्ये सर्वाधिक 15 रुग्ण सापडले. त्यामुळे वसाहतीचा परिसर प्रतिबंधीत झाला. दहा दिवसापासून घराबाहेर पडू न शकणाऱ्या ग्रामस्थांची रोजी रोटी बंद झाली. ही स्थिती पोलिसांनी जाणून घेत स्वतः च पुढाकार घेत या ग्रामस्थांना आठवडाभर पुरेल इतके धान्य वाटप केले. सत्तर हजार रुपयांच्या या मदतीने संकटातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला. 

वेळापूर येथील कोरोनाचा पहिला रुग्ण आंबेडकर नगर मध्ये सापडला होता. त्यानंतर गेल्या दहा दिवसात वेळापूरतील सर्वाधिक 15 कोरोना बाधित आढळल्याने तेव्हापासून हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित केला आहे. 

त्यामुळे रोजीरोटीसाठी बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांची अडचण झाली. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर झाल्याने स्थानिक पोलीस प्रशासन या ग्रामस्थांच्या मदतीसाठी धावून आले. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या वेळापूर येथील आंबेडकर नगर पोलिस पोहोचले. वेळापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुमारे 70 हजार रुपये किमतीचे अन्नधान्य आणि किराणा मालाचे वाटप करण्यात आले. 
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर पुरेल एवढ्यात जीवनावश्‍यक वस्तू देण्यात आल्या. विधायक उपक्रमामुळे पोलिसांच्या वर्दीतील मानवता जागी आहे याची प्रचिती वेळापूर पोलिसांनी दिली आहे. याप्रसंगी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार रेगुडे, पोलिस कॉस्टेबल बंदुके, बिभीषण मुंगूसकर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोशल मीडिया चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विकी वाघे, दत्तात्रय माळी, गजानन सावंत, अमोल साठे, ग्रामपंचायतचे धनाजी धांडोरे व त्यांचे सहकारी कर्मचारी उपस्थित होते. 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT