सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीण भागाला दिलासा; आज केवळ 138 कोरोनाबाधित 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला आज काहीसा दिलासा मिळाला आहे. आज केवळ 138 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील काही महिन्यांपासून आज आढळून आलेली संख्या ही खूपच कमी असल्याचे अहवालावरुन दिसून येते. 
आज एकूण दोन हजार 63 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 925 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 138 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज 258 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे. आज बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. याशिवाय आज कोरोनाने पाच जणांचा बळी घेतला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या आता 26 हजार 674 एवढी झाली आहे. तर 730 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अद्यापही पाच हजार सहा जण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन 20 हजार 938 जण आपापल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत. 
आज पाटकुल (ता. मोहोळ) येथील 57 वर्षाचे पुरुष, देवकते वस्ती कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 67 वर्षाचे पुरुष, अलीपूर रोड बार्शी येथील 72 वर्षाचे पुरुष, पाटकुल (ता. मोहोळ) येथील 80 वर्षाची महिला तर चांदापुरी (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT