सोलापूर

आजारी जावयाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह 

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील वरवडे या सासुरवाडीला आलेल्या आजारी जावयाचा शासकीय रुग्णालयात घेण्यात आलेल्या स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्याची पत्नी, मुलगा व अन्य नातेवाइकांच्या स्वॅबचा अहवाल अद्याप आलेला नाही. वरवडे येथील जावयाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने माढा तालुक्‍यातील जनता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीतून चिंतामुक्त झाली असून नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. 

चाकण येथे वास्तव्यास 
जिल्ह्यातील वरवडे येथील जावई चाकण येथे वास्तव्यास होता. त्यास 17 मेला अर्धांगवायू झाल्याने चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले होते. 23 मेला जावयाचा स्वॅब घेण्यात आला होता. दरम्यान, 24 मेला रुग्णालयातून सोडण्यात आल्याने नंतर इतरत्र सोय नसल्याने त्याचे नातेवाईक आजारी जावयास माढा तालुक्‍यातील वरवडे या सासुरवाडीस घेऊन आले. 

प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी 
कोरोना ग्राम समिती सदस्य व सरपंच आशा गायकवाड यांनी रुग्ण येथे आल्यानंतर प्रथम परिते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची तपासणी केली. हातावर शिक्का मारून रुग्णास होम क्वारंटाइन केले. त्यानंतर पुण्यातून कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याची पत्नी व मुलाला रुग्णवाहिकेतून त्वरित सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारास पाठविले होते. नातेवाइकांनाही क्वारंटाइन केले होते. शासकीय रुग्णालयात जावयाचा घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याची पत्नी व मुलाचा अहवाल अद्याप आलेला नाही, अशी माहिती माढा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पलंगे यांनी दिली. 

सोशल डिस्टन्सचे पालन करावे 
जावयाचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्याची पत्नी, मुलगा व अन्य नातेवाईकांच्या स्वॅबचा अहवाल येणार आहे. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर वरवडेतील दुकाने उघण्यास परवानगी दिली जाईल. टेंभुर्णी शहरातील दुकाने दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत उघडण्यास परवानगी दिली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी टेंभुर्णी बाजारपेठेतून वस्तूंची खरेदी करून त्वरित घरी परतावे. शहरात इतरत्र विनाकारण फिरू नये. गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सचे पालन करावे. दुकानदारांनी सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, जे मास्क वापरणार नाहीत अशांवर कारवाई करण्यात येईल. 
- राजकुमार केंद्रे, 
पोलिस निरीक्षक, टेंभुर्णी  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

RICH ZODIAC SIGNS: या राशींच्या लोकांकडे अचानक येतो इतका पैसा की जगतात हवं तसं आयुष्य! मेहनत आणि भाग्य दोन्हींची मिळते साथ

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

Manchar News : मंचर एसटी आगाराच्या ताफ्यात ‘जिजाऊं’ची भरारी; पाच नव्या एसटी बस दाखल, लवकरच अजून पाच एसटी बस मिळणार

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT