Anandacha Shidha Fiasco Solapur sakal
सोलापूर

Solapur : ‘आनंदाचा शिधा’ चा फज्जा

योजनेच्या चाैकशीची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्य शासनाच्या वतीने दिवाळीनिमित्त रेशन कार्ड धारकांना डाळ, साखर, तेल, रवा इत्यादी वस्तू १०० रुपयांमध्ये आनंद शिधा या नावाने देण्याची योजना जाहीर करण्यात आली होती. परंतु अन्न धान्य पुरवठा विभाग सोलापूर शहर व जिल्हा सोलापूर या ठिकाणी या योजनेचा फज्जा उडाला असून या योजनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे.

आनंदाचा शिधा या योजनेंतर्गत देण्यात येणारे १०० रुपयांचे किट कितीतरी कार्डधारकांना अद्याप मिळाले नाही. या किट वाटपाची सुरवातच मुळातच दिवाळीनंतर दोन-तीन दिवसांपासून झाली. हे किट प्रत्येकाला मिळाले नाही. त्यामुळे या योजनेमध्ये घोटाळा झाला आहे. या आनंद शिधा वाटपाचे आमिष दाखवून गेल्या महिन्यात देण्यात येणारे धान्य गहू, तांदूळ याचेही वाटप करण्यात आले नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व रिपब्लिकन अल्पसंख्याक विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी जक्कपा कांबळे, रावसाहेब परिकक्षाळे, मुकुंद काबंळे, सलीम मुल्ला, रफिक शेख, अरुणा सरवदे, नसरीन शेख, मनिषा काबंळे, इम्रान शेख, समीर मुजावर, इरफान कल्याणी, महबूब पठाण, प्रतीक फाळके, सोहेल जहागीरदार, नबी तांबोळी, धर्मा माने, अनिल नवगिरे, लारेन्स साळवी, दत्ता पवार, चंद्रकांत माने, सुधीर कुमावत ॠतिक फाळके, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT