सोलापूर

'ऑर्किड'च्या विद्यार्थ्यांचे 'हे' संशोधन दुर्गम भागासाठी उपयोगी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लसीकरण मोहिमेअंतर्गत दुर्गम भागात लस पोहचविण्यासाठी आईस-बॉक्‍सचा वापर केला जातो. मात्र, वेळेत लस न पोहचल्याने बहूतांशवेळा लस खराब होते. त्यामुळे अनेक बालके व महिला लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आईस पॅकऐवजी पेल्टीअर मॉड्यूल अर्धसंवाहकाद्वारे रेफ्रीजरेटरविना पोर्टेबल शितक तयार केला आहे. त्यामुळे दुर्गम भागात दर्जेदार लस पोहचवणे सहज शक्‍य होणार आहे. 

पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करुन यासिन दखनी व शुभम राऊल या विद्यार्थ्यांनी पोर्टेबल शितक तयार केला आहे. सोलारद्वारे या बॉक्‍समधील तापमान 2.8 सेल्सिअंशपर्यंत साध्य करता येते. तत्पूर्वी, सध्या वापरण्यात येणाऱ्या आईस बॉक्‍सचे तापमान साध्य करण्यासाठी वीजेचा वापर करावा लागतो. त्याची साठवण क्षमताही दिड लिटरपर्यंतच आहे. वीज नसल्यास त्या बॉक्‍समधील लस खराब होत असल्याचा अनुभव अनेकदा आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना आला आहे. काहीवेळा खराब लस दिल्याने रुग्णांना धोकाही निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी सुरु केलेल्या 'अविष्कार' आंतरविद्यापीठीय राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेत या प्रकल्पास नुकताच द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. 

ठळक वैशिष्टे... 

  • पोर्टेबल शितकचा बॉक्‍स आकार व वजनाने कमी 
  • पोर्टेबल शितक (बॉक्‍स) तयार करण्यासाठी 10 हजार 500 रुपयांचा खर्च 
  • बॉक्‍समध्ये दोन लिटरपर्यंत लस साठवण्याची क्षमता 
  • पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर : रेफ्रीजरेटरचा वापर टाळला 
  • वीजेचा वापर टाळून सोलारद्वारे तापमान साध्य करणे शक्‍य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT