milk Gallery
सोलापूर

जिल्ह्यातील 362 दूध उत्पादक संस्थांचे पुनरुज्जीवन!

जिल्ह्यातील 362 दूध उत्पादक संस्थांचे पुनरुज्जीवन! उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

या निर्णयामुळे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील या संस्थांच्या मतदानाचा अधिकार आता अबाधित राहिला आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील 362 दूध उत्पादक संस्थांवर करण्यात आलेली अंतरिम अवसायकाची कारवाई ही कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करून झाली नसल्याने, या 362 संस्थांवर केलेली अंतरिम अवसायक नेमण्याची कारवाई उच्च न्यायालयाने (High Court) रद्द ठरवली आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील या संस्थांच्या मतदानाचा अधिकार आता अबाधित राहिला आहे.

द्विसदस्यीय पीठाचे न्यायमूर्ती एस. जे. काथावला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी या याचिकेवर गुरुवारी निर्णय दिला. सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमधून करमाळा, मोहोळ, माढा, सांगोला, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्‍यातील 362 दूध उत्पादक संस्थांना मतदान प्रक्रियेतून वगळावे, मतदार यादीमधून त्यांची नावे काढावीत या मागणीसाठी मंगळवेढा तालुक्‍यातील श्री स्वामी समर्थ दूध उत्पादक संस्थेने ऍड. सारंग अराध्दे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या 362 संस्था अवसायनात घेण्याबाबत काही कारवाई करायची असल्यास संबंधित सहनिबंधक यांनी प्रत्येक सहकारी संस्थेला अंतरिम अवसायक नेमण्यापूर्वी सुनावणीची संधी देणे आवश्‍यक असल्याचा निर्वाळाही मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार, संबंधित सहनिबंधक यांनी कायद्यास अनुसरून कामकाज करावे. चार आठवड्यात संबंधित सहनिबंधकाने काय काम केले आहे, याचे पूर्तता प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयास सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. हरकत घेणाऱ्या संस्थांतर्फे ऍड. अभिजित कुलकर्णी, ऍड. श्रीनिवास पटवर्धन व श्री. चव्हाण यांनी काम पाहिले. सरकारी वकील म्हणून पंचपोर यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT