Ritewadi villagers have started an indefinite fast in front of Karmala tehsil office 
सोलापूर

दखल नाही घेतली तर आत्मदहन करू; रिटेवाडीच्या ग्रामस्थांचे चौथ्या दिवशीही उपोषण

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : येथील रिटेवाडी या उजनी पुनर्वसित गावाच्या रस्त्यासाठी निधी मंजूर असूनही रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद केल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. रिटेवाडी ग्रामस्थांनी एक ऑक्टोबरपासून करमाळा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत काम सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही? जर आमची दखल घेतली नाही, तर आम्ही आत्मदहन करू असा निर्णय रिटेवाडी ग्रामस्थांनी घेतला असल्याचे सरपंच दादासाहेब कोकरे यांनी सांगितले.

शुक्रवारी पुनर्वसिन विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश वाडकर यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन शनिवारी काम करण्याचे आश्वासन दिले. माञ शनिवारी काम सुरू झालेच नाही. या उपोषणाचा रविवारी चौथा दिवस असूनही रस्त्याचे काम सुरू करण्याचे कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रिटेवाडी हे उजनी पुनर्वसित गाव आहे. या गावाचे पुनर्वसन झाल्यापासून रस्ताच नसल्याने गावक-यांचे मोठे हाल होत होते. 40 वर्षानंतर या गावाला रस्ता मंजूर झाला. माञ 2019 ची विधानसभा होताच सुरू रस्त्याचे काम बंद झाले. हे काम सुरू करावे, अशी आमची मागणी असल्याचे आगंद गोडगे यांनी सांगितले आहे.

रिटेवाडीचे सरपंच दादासाहेब कोकरे म्हणले, गेली एक वर्षापासून आम्ही बंद पडलेल्या रस्त्याचे काम व्हावे, म्हणून प्रयत्न करत आहोत. किती तरी फे-या पुनर्वसिन कार्यालयात घातल्या. माञ या कामाचे सहाय्यक अभियंता रमेश राठोड हे कसलेच सहकार्य करत नाहीत. आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देतात. कार्यालयात भेटत नाहीत. फोन केला तर नेहमीच मी कामासाठी मुंबईमध्ये आहे, असे सांगतात. निधी मंजूर असून काम बंद का ? याचे उत्तर आम्हाला कोणीच देत नाही. आमच्या रस्त्याचे काम सुरू होईल तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही.

उजनी पुनर्वसनचे कार्यकारी अभियंता रमेश वाडकर म्हणाले, उपोषणाला बसलेल्या लोकांशी चर्चा केली आहे. रिटेवाडी रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. हे काम सुरू करून लवकरच पुर्ण करण्यावर आमचा भर राहील.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT