road stoped 
सोलापूर

पंचकट्टा ते विजापूर वेस हा मार्ग वाहतुकीसाठी बंद

तात्या लांडगे

सोलापूर : पंचकट्टा ते विजापूर वेस या मार्गावर सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर यांच्या आदेशानुसार कब्जा वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा मार्ग उद्या (शनिवारी) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष काणे यांनी दिली.

फौजदार चावडी पोलिसांचा असेल बंदोबस्त 
ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वर पंच कमिटीच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. ही जागा ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने सहदिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार कब्जा वॉरंटची बजावणी करताना पंचकट्टा ते विजापूर वेस या मार्गावर फौजदार चावडी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. दरम्यान, हा मार्ग किती दिवस बंद राहणार याबाबत शहर वाहतूक पोलिसांकडून काहीच सांगण्यात आले नाही.

कब्जा वॉरंटची बजावणी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून करताना त्या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहतुकीसाठी अडथळा होऊ शकतो. कब्जा वॉरंटची बजावणी पूर्ण होईपर्यंत शासकीय वाहने, पोलिस व अतिमहत्वाच्या वाहनांशिवाय अन्य वाहनांसाठी हा मार्ग बंद राहणार आहे. वाहनचालकांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आल्याचेही काणे यांनी यावेळी सांगितले. पंचकट्टा ते विजापूर वेस या मार्गावरू येणाऱ्या वाहनांसाठी पंचकट्टाकडून विजापूर वेसकडे जाणारी वाहने पंचकट्टा ते बेगमपेठ पोलिस चौकी ते विजापूर वेसमार्गे पुढे जाणार आहेत. तर विजापूर वेस ते पंचकट्टा या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी विजापूर वेस ते बेगमपेठ पोलिस चौकीमार्गे पंचकट्टा अशी जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT