सोलापूर

निराधार, अनाथांचे संगोपन करायचे कसे? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरही मिळेना निधी

कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील एक लाख 43 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. अनेकांचा सुखी संसार विस्कटला, चिमुकली अनाथ झाली. काही कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिलेचा मृत्यू झाल्याने उदरनिर्वाहासह मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला.

तात्या लांडगे

सोलापूर : ज्या कुटुंबातील कर्ता मयत झाला, त्या निराधार बालकांना महिला व बालविकास विभागातर्फे बालसंगोपन योजनेतून दरमहा अकराशे रुपयांची मदत दिली जाते. कोरोना काळात अनाथ झालेल्या निराधार बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे प्रलंबित असल्याने सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 320 निराधार बालकांना बालसंगोपनाचा लाभ मिळाला नसून जिल्ह्यातील 38 पैकी 17 अनाथ बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मिळाले असून उर्वरित अनाथांना ती मदत मिळालेली नाही.

कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील एक लाख 43 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. अनेकांचा सुखी संसार विस्कटला आणि चिमुकली अनाथ झाली. काही कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिलेचा मृत्यू झाल्याने उदरनिर्वाहासह मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला. या पार्श्‍वभूमीवर कोरोनामध्ये ज्या मुलांचे दोन्ही पालक मयत झाले, त्या अनाथ बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला. तत्पूर्वी, ज्या मुलांचा सांभाळ करणारा पालक मयत झाला, त्या कुटुंबातील मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ दिला जातो. मात्र, कोरोना काळात तशा मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि निधीची पंचाईत झाली. प्रत्येक जिल्ह्यातून एक हजारांहून अधिक प्रस्ताव महिला व बालविकास विभागाकडे पाठविण्यात आले. मात्र, निधीअभावी त्यातील बहुतेक निराधार बालकांना त्या योजनेच्या लाभाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. कुटुंबातील कर्ता अचानक कुटुंबातील मयत झाल्याने घरकाम करणाऱ्या महिला कामाच्या शोधासाठी वणवण फिरू लागल्याचे चित्र आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली, परंतु ठोस तोडगा निघालच नाही. राज्यात बालविवाह वाढू लागले आहेत. निराधारांना मदत मिळेना, त्यांच्या शिक्षणासाठी काहीच ठोस योजना नाही. त्यामुळे महिला व बालविकास विभागावर अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

जिल्ह्यातील जवळपास तीनशे मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्यावा, असा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. तर कोरोना काळात अनाथ झालेल्या 17 बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मिळाले असून उर्वरित मुलांनाही काही दिवसांत त्यासाठी निधी मिळेल.
- डॉ. विजय खोमणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

जिल्ह्यातील निराधारांची स्थिती
कोरोनातील अनाथ बालके
38
मदतीच्या प्रतीक्षेतील अनाथ
21
बालसंगोपनास पात्र निराधार
920
लाभाच्या प्रतीक्षेतील बालके
320

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT