SMC
SMC 
सोलापूर

सत्ताधारी भाजपने चार वर्षांत एकदाही वेळेत मांडले नाही बजेट ! नगरसेवक भांडवली निधीवरून आक्रमक 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनामुळे यंदाचे (2020- 21) वार्षिक बजेट सत्ताधारी भाजपने अजूनही मांडलेले नाही. मोदी लाटेत अनेक तपानंतर सत्तेत आलेल्या भाजपमधील नगरसेवकच आता भांडवली निधीसाठी आक्रमक होऊ लागले आहेत. मागील तीन वर्षांत सत्ताधाऱ्यांनी एकदाही वेळेत बजेट मांडले नाही. आता दोन-अडीच महिन्यांसाठी बजेट मांडण्यात येणार असून ते बजेट फेटाळण्यासाठी महाविकास आघाडीने समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी आणखी सखोल अभ्यास सुरू केला असून 11 जानेवारीऐवजी हे बजेट आता 18 जानेवारीनंतर मांडण्याचे नियोजन आहे. 

महापालिका सत्ताधाऱ्यांनी 2017-18 पासून सलग तीन वर्षे वार्षिक बजेट मांडताना किमान तीन ते पाच महिन्यांचा विलंब केला. या तीन वर्षांत बजेटनुसार वसुली झाली नसून उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल नऊशे कोटींहून अधिक महसुली उत्पन्न कमी आले आहे. आता कोरोनामुळे व्यापारी, गाळेधारकांसह अन्य करदात्यांवर करभरणा करण्यासाठी कारवाई करण्यास अडचणी आहेत. अशा परिस्थितीत महापालिका आयुक्‍तांनी मांडलेले बजेट मंजूर करून आगामी बजेटची तयारी करण्याचे सोडून सत्ताधारी दोन महिन्यांसाठी बजेट मांडण्याचा आग्रह करीत आहेत. बजेटनुसार मिळणारा महसूल भांडवली निधीसाठी वापरण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे प्रशासनाला आगामी वर्षाच्या बजेटची तयारी फेब्रुवारी 2021 पासून करावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरू असतानाच हे बजेट मांडले जाणार आहे. तर सत्ताधाऱ्यांनी बजेट मांडल्यानंतर डिसेंबरपर्यंतचे उत्पन्न पाहून प्रशासनाला त्यात बदल करून सुधारित बजेट तयार करावे लागणार आहे. त्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार असल्याने आता मांडले जाणारे बजेट नेमके किती महिन्यांसाठी असेल, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

संक्रांतीनंतर सादर होईल नवे बजेट 
कोरोनामुळे यंदाचे वार्षिक बजेट विलंबाने मांडले जात आहे. बजेट विलंबाने होत असले तरीही, विकासकामे थांबलेली नाहीत. दोन- अडीच महिन्यांसाठी आता बजेट मांडले जाणार असून त्याचा अभ्यास सुरू आहे. 11 जानेवारीला नव्हे तर 18 जानेवारीपर्यंत बजेट सभागृहात सादर केले जाईल. आगामी वर्षाचे बजेट लवकर होईल, असेही प्रयत्न सुरू आहेत. 
- श्रीकांचना यन्नम, 
महापौर 

आयुक्‍तांनी बजेट मांडूनही सत्ताधाऱ्यांचा आग्रह 
फेब्रुवारी 2020 मध्ये महापालिका आयुक्‍तांनी 2020- 21 चे तब्बल 700 कोटी रुपयांचे बजेट मांडले आहे. त्यात शासकीय अनुदान, नगरसेवकांचा वॉर्डवाईज निधी आणि महसुली उत्पन्नाचा समावेश आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती, मागील तीन वर्षातील महसुली उद्दिष्टे आणि प्रत्यक्षात मिळालेले उत्पन्न, यावर आधारित हे बजेट मांडण्यात आले आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधी नगरसेवक आता भांडवली निधीसाठी आक्रमक झाल्यानंतर, त्याचा फटका पक्षाला बसू शकतो, या भीतीने सत्ताधारी आता दोन महिन्यांसाठी बजेट मांडण्याचा हट्ट करीत असल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी, यंदा महापालिकेला 371 कोटींचे महसुली उत्पन्न मिळेल, असे अंदाजपत्रक बजेटद्वारे मांडण्यात आले. मात्र, डिसेंबरअखेर त्यातील 62 कोटी रुपयांचाच महसूल वसूल झाला आहे. त्यामुळे आता नवे बजेट मांडून काय साध्य होणार, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT