सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीण भागात पुन्हा 411 जण कोरोनाबाधित 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज पुन्हा 411 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दोन हजार 742 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी दोन हजार 331 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 411 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज 608 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडले आहे. त्याचबरोबर नऊ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या पंचवीस हजाराच्या पुढे गेली असून आज आलेल्या अहवालानंतर हा आकडा 25 हजार 435 एवढा झाला आहे तर आतापर्यंत 688 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अद्यापही रुग्णालयात सहा हजार 70 जण उपचार घेत आहेत. 18 हजार 677 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. 

आज जे नऊ जण मृत्यूमुखी पडले आहेत. ते सर्वही पुरुषच आहेत. आज न्यू समर्थ नगर मोहोळ येथील 69 वर्षाचे, देवकते वस्ती कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 60 वर्षाचे, नाझरे (ता. सांगोला) येथील 55, जवळा (ता. सांगोला) येथील 88 वर्षाचे, वैराग (ता. बार्शी) येथील 60 वर्षाचे, आनंदनगर अकलूज (ता. माळशिरस) येथील 72 वर्षाचे, नाझरे (ता. सांगोला) येथील 43 वर्षाचे, अकलूज (ता. माळशिरस) येथील 55 वर्षाचे, तर भोसे (ता. पंढरपूर) येथील 56 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT