Police action 
सोलापूर

मास्क न घालणाऱ्यांना पोलिसांकडून "एवढा' दंड; दोन दिवसांत साडेदहा लाख रुपये वसूल ! 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग चिंताजनक असल्याने ग्रामीण पोलिसांनी आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसांत जिल्ह्यातील 25 पोलिस ठाण्याअंतर्गत पाच हजार 63 जणांवर कारवाई करीत पोलिसांनी तब्बल 10 लाख 49 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बेशिस्त नागरिकांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने नवे आदेश काढून दंडात्मक कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी 6 व 7 जून या दोन दिवसांतच तब्बल साडेदहा लाखांचा दंड वसूल केला आहे. त्यामध्ये मास्क न घालणाऱ्या तीन हजार 518, डबलसीट दुचाकीस्वार एक हजार दोन, दुचाकीवर तिघे असलेल्या 92 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तसेच तीनचाकी व चारचाकी वाहनात अधिक प्रवासी असलेल्या 170 वाहनचालकांना, दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक वेळ दुकान सुरू ठेवणाऱ्या 22 दुकानदारांना, दुकानासमोर पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती थांबविल्याप्रकरणी 48 दुकानदारांना, सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 90 व्यक्‍तींना, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या 47 व्यक्‍तींना, सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू खाणाऱ्या 74 जणांना पोलिसांनी दंड केला आहे. 

ग्रामीण पोलिसांनी "अशी' केली कारवाई 

  • मास्क न घालणाऱ्यांना दंड : 3,50,900 रुपये 
  • डबलसीट दुचाकीस्वार : 4,89,900 रुपये 
  • तीन-चारचाकी वाहनांना दंड : 91,900 रुपये 
  • दुकानदारांकडून वेळेचे उल्लंघन : 22,000 रुपये 
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी : 17,000 रुपये 
  • सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, दारू सेवन : 18,100 रुपये 
  • सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही : 30,100 रुपये 

नागरिकांना स्वयंशिस्त लागावी म्हणून कारवाई 
मास्क न घालणे, दुचाकीवरून डबलसीट प्रवास करणे, तीन-चारचाकीतून दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे, दुकानांना दिलेल्या वेळेचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मद्यपान करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आणि दुकानांसमोर पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती थांबवून ठेवल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग खंडित करून हा विषाणू हद्दपार करण्यासाठी नागरिकांना स्वयंशिस्त लागावी, या हेतूने ही कारवाई केली जात असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक (ग्रामीण) अतुल झेंड यांनी दिली. 

हेल्मेटचा वापर दुचाकीस्वारांना बंधनकारक 
राष्ट्रीय तथा राज्य मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दोन टक्‍केदेखील दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसल्याची स्थिती पाहायला मिळते. आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकमेकांच्या संपर्कातून संसर्ग होऊ नये म्हणून हेल्मेटची गरज आहे. तर दुसरीकडे अपघातातून बचाव होण्यासाठीही त्याची गरज आहे. त्यामुळे आता दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT