Water  sakal
सोलापूर

पंढरपुरातील पाणीपट्टी वाढीला विरोध; साधना भोसले यांचा आंदोलनाचा इशारा

पंढरपूर नगरपालिकेच्या प्रशासकांनी अंदाजपत्रकीय सभेत पाणीपट्टीमध्ये तब्बल २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेच्या प्रशासकांनी अंदाजपत्रकीय सभेत पाणीपट्टीमध्ये तब्बल २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक अडचणीत आलेले असताना पाणीपट्टी एकदम २५ टक्के वाढवणे चुकीचे आहे. प्रशासनाचा हा निर्णय सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारा आहे. हा निर्णय रद्द करावा आणि पाणीपट्टी आकारणी पूर्वीच्या दराने करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाव्दारे करणार आहे. आमच्या मागणीची दखल घेऊन दरवाढ रद्द केली नाही, तर नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दिला आहे.

पंढरपूर पालिकेत सध्या प्रशासक आहे. प्रांताधिकारी गजानन गुरव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ता. २८ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर नगरपालिकेची अंदाजपत्रकीय सभा झाली. या सभेत पाणी पुरवठ्यासाठी होणारा खर्च आणि प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न यामध्ये सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांची तफावत आहे. या कारणावरुन हा तोटा कमी करण्यासाठी प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाणीपट्टी मध्ये २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकारांशी बोलताना सौ. भोसले म्हणाल्या, गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक अडचणीत आले आहेत. आता कुठे जनजीवन पूर्ववत होऊ लागले आहे. असे असताना प्रशासकांनी पाणीपट्टीमध्ये एकदम २५ टक्के दरवाढ केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय त्वरीत रद्द करावा, असे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी यांना देणार आहोत. त्यानंतरही निर्णय रद्द केला नाही तर नगरपालिकेसमोर आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला.

महाविकास आघाडीचाही विरोध

दरम्यान, माजी विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे यांनी देखील प्रशासनाच्या पाणीपट्टी वाढीच्या निर्णयास विरोध केला असून दरवाढी विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 176 अंकांनी घसरणीसह बंद; मेटल आणि आयटीमध्ये जोरदार विक्री, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराह IN, मग कोण OUT? लॉर्ड्स कसोटीसाठी इरफान पठाणने निवडली Playing XI; अशीच असेल टीम इंडिया

EMI Debt Trap: मध्यमवर्ग ईएमआयच्या जाळ्यात; 5 पैकी 3 लोकांवर तीनपेक्षा जास्त कर्ज, काय आहे कारण?

Latest Maharashtra News Live Updates: पुण्यात मटण पार्टीसाठी दुकान फोडले मात्र एक चूक आणि चौघे पोलिसांना सापडले

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

SCROLL FOR NEXT