The Sahakar Maharshi factory has produced 2.25 lakh of sugar in a month.jpg 
सोलापूर

'सहकारमहर्षी'चे एका महिन्यात 2.25 लाख पोती साखरेचे तर 1.25 कोटी युनिट विजेचे उत्पादन !

शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : सहकारमहर्षी कारखान्यात उत्पादित झालेल्या 2 लाख 25 हजार 555 व्या साखर पोत्याचे पूजन संचालक रावसाहेब मगर यांच्या हस्ते तर सहवीज निर्मिती प्रकल्पात 1 कोटी 25 व्या युनिटचे पूजन संचालक शंकरराव माने-देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यात सन 2020-21 चा ऊस गळीत हंगाम सोमवार (26 ऑक्‍टोबर) रोजी सुरू झाला असून, गुरुवार (26 नोव्हेंबर) अखेर 2 लाख 51 हजार 609 मे. टन उसाचे गाळप होऊन 2 लाख 26 हजार 750 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 9.45 टक्के व आजचा उतारा 9.98 टक्के आहे. मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील आणि अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिपथावर असणाऱ्या या कारखान्यात प्रतिदिन 8 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. 

सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये गुरुवार (ता. 26) अखेर 2 कोटी 17 लाख 17 हजार 607 युनिट वीज निर्माण होऊन 1 कोटी 37 लाख 61 हजार 989 युनिट वीज विक्री केली आहे. तसेच उपपदार्थ प्रकल्पातील डिस्टिलरीमध्ये 20 लाख 04 हजार 967 लिटर्स रेक्‍टीफाईड स्पिरीट तसेच 12 लाख 61 हजार 657 लिटर्स इथेनॉल, ऍसेटिक ऍसिड प्रकल्पात 118 मे. टन ऍसिटाल्डीहाईड व 102 मे. टन ऍसिटिक ऍसिडची निर्मिती झाली असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. 

या वेळी करखान्याचे उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील तसेच संचालक नामदेव ठवरे, लक्ष्मण शिंदे, धनंजय चव्हाण, राजेंद्र मोहिते, चांगदेव घोगरे, कमल जोरवर, भारत फुले, भीमराव काळे, सतीश शेंडगे, रावसाहेब पराडे, धनंजय एकतपुरे यांच्यासह विनायक केचे, अनिलराव कोकाटे, रामचंद्र ठवरे, नामदेव चव्हाण, चंद्रशेखर दुरापे, अमरसिंह माने-देशमुख, दिलीप घुले, खातेप्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नापिकी, भावही नाही अन् कर्जाचं ओझं वाढलं, शेतकरी दाम्पत्यानं घेतला विषाचा घोट; पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज

Jayakwadi Dam: पैठण व माजलगाव तालुके धोक्याच्या छायेत; धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने गोदाकाठची गावं संकटात

Pune Rain News : पुण्यात ११ तासांपासून मुसळधार पाऊस, नागरिकांचे हाल; सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Kalu Waterfall Accident : काळू धबधब्याजवळ दरड कोसळून दुर्घटना, २३ वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू;

मंदिरात लग्न, गर्भपात अन् MBBS विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू; मुलीच्या तोंडातून येत होता फेस, दोन डॉक्टरांची धक्कादायक प्रेमकहाणी

SCROLL FOR NEXT