sahitya samelan sakal
सोलापूर

साहित्य संमेलनामुळे समाजात एकीची भावना : संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे

साहित्य वेगळ्या स्तरावर जाण्यासाठी लिखाण करणे गरजेचे आहे

दत्तात्रय खंडागळे, सांगोला

सांगोला : साहित्य संमेलनामुळे समाजात एकीची भावना निर्माण होते. समाजाची संघटनशक्ती आजच्या काळाची गरज आहे. दुसरे कोणी तरी आपले प्रश्न सोडवतील हा विचार करणे बंद करा. आपणालाच आपले प्रश्न सोडवावे लागतील. चांगल्या शिक्षणासाठी आता जास्तीत जास्त ज्ञान मंदिरे उभे राहिली पाहिजेत अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे यांनी व्यक्त केली.

स्वर्गीय माजी आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या स्मरणार्थ चौथे दोन दिवशीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनास शनिवार (ता. 23) पासून सांगोला येथे प्रारंभ झाला. यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे बोलत होते. या संमेलनाचे उदघाटन श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख व चंद्रकांत देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब देशमुख, तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले, संमेलनाध्यक्ष डॉ. आर. एस. चोपडे, स्वागताध्यक्ष प्रा. संजय शिंगाडे, बाळासाहेब करनवर, संभाजी सुळ, माजी नगराध्यक्षा राणी माने यांच्यासह समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्राचार्य आर. एस. चोपडे म्हणाले की, 75 वर्षात केवळ 2 खासदार आणि 20 आमदार आजपर्यंत संसदेपर्यंत पोहचले आहेत. याचा आता अभ्यास करणे गरजेचे आहे. साहित्य वाचले पाहिजे, साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. लोकसभेत व विधानसभेत प्रभावी यंत्रणा नसल्यामुळे व समाजाचे कमी लोक असल्यामुळे आपल्या समस्या सुटत नाहीत. संघटन शक्ती गरजेची आहे. आपल्यातील हिमत जागी करा तरच समाजाचे प्रश्न सुटणार आहेत. धनगर व धनगड यामध्ये केवळ प्रिंट मिस्टेक असून समजाची निरपक्षीय संघटना तयार झाली पाहिजे. महानंदाचे संचालक चंद्रकांत देशमुख म्हणाले की, साहित्य संमेलन ही एक चळवळ आहे. संमेलनामुळे साहित्यासाठी एक नवीन वाट तयार झाली आहे. साहित्य वेगळ्या स्तरावर जाण्यासाठी लिखाण करणे गरजेचे आहे. या साहित्य संमेलनामुळे सांगोल्यात साहित्याचे दालन निर्माण होण्यास मदत होणार आहे.

साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आपल्या समाजामध्ये अनेक जण बुद्धिवंत, कर्तुत्ववान, प्रामाणिक लोक आहेत. असे असले तरी आपल्या समाजाचा इतिहास व साहित्य अडगळीत पडले आहे. सत्तेचा वाटा कोण कोणाला देत नसल्याचे सांगून ही सत्ता सुद्धा आपण एकत्र येऊन एकजुटीने मिळवली पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हे व्यासपीठ स्थापन केले आहे. सोलापूर , लातूर आणि म्हसवड येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. तहसीलदार अभिजित पाटील म्हणाले, सांगोला सोन्याचे म्हणून यापूर्वी ओळखले जात होते, आता साहित्याचे सांगोले म्हणून ओळखले जाईल.

मुख्याधिकारी कैलास केंद्रे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, बहुजन समाज अनेक गोष्टीमध्ये अडकला आहे. बुध्दीवान लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. दर्जेदार साहित्याची निर्मिती होणे आवश्यक असून सर्वांचे प्रबोधन झाले पाहिजे. साहित्य संमेलन होत असतात असे सांगत तरुण वर्ग हा जेव्हा प्रशासनामध्ये प्रशासक म्हणून काम करेल, स्वतः इतरांना रोजगार देईल असे जेव्हा घडेल तेव्हाच साहित्य संमेलन यशस्वी झाले असे म्हणावे लागेल. उद्घाटनसमारंभानंतर सांस्कृतीक कार्यक्रम, कवी संमेलन संपन्न झाले. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष प्रा. संजय शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. सविता दूधभाते, प्रा.शोभनतारा मेटकरी व अनिल रुपनवर यांनी केले. आभार कुंडलिक आलदर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT