kARKAMB 
सोलापूर

"सकाळ' इफेक्‍ट ! वाहक-चालकांच्या मनमानीला चाफ; आता सर्वच एसटी बस करकंब स्थानकावरूनच जातील 

सूर्यकांत बनकर, करकंब

करकंब (सोलापूर) : करकंब मार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या बस बस स्थानकावरूनच जातील. याबाबत सर्व वाहक व चालकांना सूचना दिल्या असून इतर आगार प्रमुखांनाही पत्रव्यवहार केला असल्याचे लेखी पत्र पंढरपूर आगार प्रमुखांनी करकंब ग्रामपंचायतीस दिले आहे. याबाबत "ई - सकाळ' व "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचे सोशल मीडियातून जोरदार स्वागत झाल्यानंतर एकाच दिवसात प्रश्न मार्गी लागल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

जत-धुळे या बसमधून मंगळवारी (ता. 2) चालक आणि वाहकांनी करकंबच्या प्रवाशांना बस स्थानकावर बस न नेता नियमबाह्य खाली उतरविल्यानंतर संबंधित प्रवाशांनी पंढरपूर आगारात रीतसर तक्रार नोंदविली होती. याबाबत बुधवारी (ता. 3) "ई-सकाळ'वर तर गुरुवारी (ता. 4) दैनिक "सकाळ'मध्ये "बस चालक-वाहकांची मनमानी' ही बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीचे आणि प्रवाशांनी केलेल्या तक्रारीचे सोशल मीडियामधून जोरदार स्वागत झाले होते. 

शिवाय शुक्रवारी (ता. 5) करकंब ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच तेजमाला पांढरे यांच्या सही- शिक्‍क्‍याचे लेखी पत्र प्रा. सतीष देशमुख, अभिषेक पुरवत, अशोक जाधव, ओंकार जाधव, सतीश माळी आदींनी पंढरपूर आगारप्रमुखांना देऊन सर्व बस करकंब बसस्थानकातून नेण्याची मागणी केली. याशिवाय करकंबला वाहतूक नियंत्रण कक्ष चालू करावा, पंढरपूर - मोडनिंब ही बस करकंब मार्गे चालू करावी, वाहक व चालकांची मनमानी थांबवावी आदी मागण्या या पत्रातून करण्यात आल्या. त्यानंतर तातडीने आगार व्यवस्थापकांनी करकंब ग्रामपंचायतीच्या नावे लेखी पत्र देऊन सर्व लांब पल्ल्याच्या बसना करकंब बसस्थानकावर थांबा देण्यात आल्याचे कळविले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT