MIDC esakal
सोलापूर

सकाळ इम्पॅक्ट! ‘एमआयडीसी’ने ३००० रुपयांत दिली महापालिकेला अग्निशमन केंद्राला जागा; ४५ फायरमनची होणार भरती

आगीच्या घटनेनंतर संभाव्य वित्तहानी व जीवितहानी टळावी, या हेतूने MIDCने महापालिकेला तीन हजार स्क्वेअर मीटर जागा दिली आहे. भूखंडापोटी तीन हजार रुपये भरावे आणि जागा ताब्यात घ्यावी, असे पत्र ‘एमआयडीसी’कडून महापालिकेला पाठविण्यात आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीतील उद्योजकांना अग्निशामक विभागाची तत्काळ मदत व्हावी, आगीच्या घटनेनंतर संभाव्य वित्तहानी व जीवितहानी टळावी, या हेतूने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने महापालिकेला तीन हजार स्क्वेअर मीटर जागा दिली आहे. भूखंडापोटी तीन हजार रुपये भरावे आणि जागा ताब्यात घ्यावी, असे पत्र ‘एमआयडीसी’कडून महापालिकेला पाठविण्यात आले आहे.

सोलापूर शहराच्या पूर्वेला अक्कलकोट रोड एमआयडीसी असून त्याठिकाणी गारमेंट व वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. शहरात १ एप्रिल २०२२ ते २५ जुलै २०२३ या काळात १३ जणांचा आगीत मृत्यू झाला आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसीत डिसेंबर २०२२ ते जून २०२३ या काळात सर्वाधिक आगीच्या घटना घडल्या.

तत्पूर्वी, अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुभाष देशमुख यांनी अक्कलकोट रोड एमआयडीसीत स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे आणि त्यासाठी एमआयडीसीने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर ‘सकाळ’ने देखील सातत्याने पाठपुरावा केला होता. २० जुलै रोजी ‘एमआयडीसीला प्रस्ताव; तरीही अग्निशामक केंद्र सुरु करण्याकडे दुर्लक्ष या मथळ्याखाली ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन राज्याच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बैठक घेऊन महापालिकेला अक्कलकोट रोड एमआयडीसीत अग्निशामक केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.

दोन टप्प्यात भरावे लागणार तीन हजार रुपये

अग्निशमन केंद्रासाठी ‘एमआयडीसी’ने महापालिकेला जागा दिली आहे. आता भूखंडापोटी ७५० रुपये पहिल्यांदा महापालिकेला भरावे लागणार आहेत. त्यानंतर तो भूखंड ताब्यात घेताना दोन हजार २५० रुपये ‘एमआयडीसी’कडे भरावे लागतील. जागा ताब्यात घेतल्यानंतर त्याठिकाणी अग्निशामक केंद्र उभारण्याचा खर्च महापालिकेलाच करावा लागणार आहे. आता किती दिवसांत महापालिका त्या जागेवर केंद्र सुरु करणार, याकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

४५ फायरमनची होणार भरती

सोलापूर शहरात सध्या रविवार पेठ, भवानी पेठ, सावरकर मैदान, होटगी रोड व अक्कलकोट रोड या पाच ठिकाणी अग्निशामक केंद्रे आहेत. दहा गाड्या आणि ३६ कर्मचाऱ्यांवर हा विभाग काम करतोय. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी एक अग्निशामक गाडी देण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. पण, ती गाडी अजून मिळालेली नाही. आता नवीन केंद्र होणार असल्याने त्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आता सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक विभागात ४५ फायरमनची (अग्निविमोचक) भरती देखील होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT