Ajit Pawar and Sharad Pawar Sakal
सोलापूर

Sakal Survey : नेत्यांचा दोन्ही डगरीवर हात!

२०१४ पूर्वी सोलापूर जिल्ह्यात विधानसभा असो की सहकार शरद पवार यांचेच वर्चस्व होते.

अभय दिवाणजी

Sakal Survey - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंड पेल्यातील वादळ ठरण्याची शक्यता गृहीत धरुन सोलापूर जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी कुटुंबातील काही सदस्यांना थोरले काका गटात तर, काही दादा गटात पाठवून दोन्ही डगरीवर हात ठेवले आहेत.

२०१४ पूर्वी सोलापूर जिल्ह्यात विधानसभा असो की सहकार शरद पवार यांचेच वर्चस्व होते. २०१६ पर्यंत विधान परिषदेवर वर्चस्व होते. विजयसिंह मोहिते-पाटील, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, दिलीप सोपल यांना राष्ट्रवादीतून मंत्रिपदाची संधी मिळाली. पण सध्या यातील कोणीही त्यांच्या बाजूने नाही.

अजित पवारांनी २००६ मध्ये सोलापूर जिल्ह्यात आपला गट उभारण्यास सुरुवात केली. आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी तेव्हा राष्ट्रवादीतच असणाऱ्या मोहिते-पाटलांवर शरसंधान करण्यासाठी बागल गटास त्यांनी मोठी ताकद दिली होती. प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनाही चांगली ताकद दिली.

यावेळी त्यांनी अजित पवार यांची पाठराखण केली असतानाच राजन पाटील व त्यांचे चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे यांनीही अजित पवार गटात उडी घेतली हे विशेष! विधान परिषदेचे माजी आमदार दीपक साळुंके-पाटील यांनी अजित पवार तर त्यांची बहिण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी शरद पवार तर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे शरद पवार तर, त्यांचा मुलगा जितेंद्र साठे यांनी अजित पवार यांच्या गटात राहणे पसंत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Police Service: खाकीतील माणुसकीचा अनोखा चेहरा! 112 वर कॉल करा, पोलिस पोहोचवतील औषधे आणि जीवनावश्यक वस्तू

Video : निष्ठा असावी तर अशी! मालकाचा जीव वाचवण्यासाठी कुत्र्याने शेवटच्या श्वासापर्यंत कोब्राशी दिली झुंज; व्हिडिओ पाहून नेटकरीही हळहळले

RBI on Inflation: दिवाळीत महागाईचा फटका बसणार? RBI गव्हर्नरांचा मोठा इशारा; कारण काय?

Latest Marathi News Live Update : विरोधकांनी रांचीमध्ये JPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांशी चर्चा केली का? भाजप खासदार जगदंबिका पाल यांचा सवाल

NCP Politics: मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

SCROLL FOR NEXT