love story 
सोलापूर

दोघांच्या लग्नानंतरचा सुरू असलेला संघर्ष 

सुस्मिता वडतिले

सोलापूर : येथील मड्डी वस्ती येथे राहणारे सखूबाई व नागनाथ यांची ही हृदयस्पर्शी कहाणी. सध्या सखूबाईंचे वय 65 तर नागनाथ यांचे वय 70 वर्षे आहे. सखूबाईंचे वयाच्या 10व्या वर्षीच लग्न झाले. काही वर्षांनंतर या संसाररूपी वेलीवर एक फूल उमलले. परंतु दोन-तीन वर्षांतच त्यांच्या पतीचे निधन झाले. यानंतर लहान जिवाच्या पालनपोषणासाठी त्या कामाच्या शोधार्थ नागनाथ यांच्या घरी धुणीभांडी करण्यासाठी गेल्या. त्यावेळी नागनाथ यांच्या वहिनींनी सखूबाईंना कामासाठी ठेवून घेतले. सखूबाई तिच्या मुलाचा सांभाळ करत काम करू लागल्या. नागनाथ यांचे लग्न झाले होते, पण त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. त्यामुळे नागनाथ एकाकी जीवन जगत होते. त्यावेळी सखूबाईंना पाहून नागनाथ यांच्या वहिनींच्या मनात या दोघांचे लग्न लावून दिण्याचा विचार आला. 
एकटी राहण्यापेक्षा नागनाथ यांच्याबरोबर पुनर्विवाह करण्याचा सल्ला सखूबाईंना देण्यात आला. सखूबाईंनी लहान मुलाचा विचार करून पुनर्विवाहास होकार दिला. दोघांचे लग्न झाले. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. मात्र काही वर्षांनी सखूबाईंच्या मुलाचे निधन झाले. त्यातच घरची परिस्थिती अगदी बेताचीच होती. 
घर चालवण्यासाठी कित्येक वर्षापासून हे दांपत्य आजही अनेक मंदिरांच्या बाहेर बसून रोजची भूक भागवतात. रोज पहाटे पाच वाजता घरातून बाहेर पडतात आणि रात्री आठ वाजता घरी येतात. गुरुवारी दत्त मंदिर, शनिवारी मारुती मंदिर, मंगळवारी गणपती मंदिर व महालक्ष्मी मंदिर आणि बाकीच्या दिवसांत मशिदीत जाऊन बसतात. असा हा त्यांचा रोजचा दिनक्रम सुरू असतो. आज दोघांच्या लग्नाला 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही एकमेकांच्या आधाराने हे जोडपं त्यांच्या संसाराचा गाडा चालवत आहे. आजही त्यांचा जीवन संघर्ष सुरूच आहे. एकमेकांशिवाय आपल्याला कुणी नसल्यामुळे ते दोघे एकमेकांची काळजी घेऊन सुखी संसार करत आहेत. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते, त्यातीलच एक उदाहरण म्हणजे हे वृद्ध जोडपं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT