Sambhaji Brigade unique movement against pollution in Dharamveer Sambhaji Lake solapur sakal
सोलापूर

Sambhaji Brigade : जलपर्णीचा गुच्छ अन्‌ अंगावर जलपर्णीहार!

धर्मवीर संभाजी तलावातील प्रदूषणाविरुद्ध संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : संभाजी तलावात वाढलेल्या जलपर्णीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर जलपर्णी घालून अतिरिक्त आयुक्तांना जलपर्णीचा गुच्छ देत अनोखे आंदोलन केले. विजयपूर रोड भागातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या धर्मवीर संभाजी महाराज तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण होण्यासाठी गेल्या सात- आठ वर्षांपासून संभाजी ब्रिगेड पाठपुरावा करीत आहे. संभाजी तलाव सुशोभीकरण व संवर्धनासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने सहा कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. गेल्या पाच- सहा वर्षांपासून या तलावातील जलपर्णी व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मध्यंतरी सहा महिने जलपर्णी काढण्याचे काम एका ठेकेदाराकडून करून घेण्यात आले.

त्याला लाखो रुपये खर्च झालेला जनतेचा कररूपी पैसा वाया जात आहे. तरीही तलावातील जलपर्णीचे समूळ उच्चाटन झाले नाही. त्यातून संभाजी तलावाचे एक पर्यटनस्थळ म्हणून विकास होणे गरजेचे होते; पण या ठिकाणी महापालिका अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अमित जाधव, जिल्हा सचिव राहुल सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र माने, शहर उपाध्यक्ष सीताराम बाबर, जलपर्णी घेऊन आंदोलन करणारे संभाजी ब्रिगेडचे शहर संघटक दत्ता जाधव, श्रीकांत कोळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT