Abhijit Patil esakal
सोलापूर

Abhijit Patil : रखडलेल्या नंदेश्वर पोलीस स्टेशनला मंजुरी द्या ; अभिजीत पाटील

तालुक्याच्या दक्षिण भागात बहुतांश गावे

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा सध्या असलेल्या पोलीस ठाण्यावरील अतिरिक्त भार पाहता प्रास्तावित केलेले नंदेश्वर येथील पोलीस स्टेशन मंजूर करावे अशी मागणी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

याबाबतची मागणी त्यांनी मुंबई भेटीत केली असून या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील 79 गावे व शहर व त्याची लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस स्टेशन मंजूर केले परंतु हे मंजूर पोलीस स्टेशन नंदेश्वर येथे प्रस्तावित केले आहे मात्र प्रशासकीय पातळीवर अद्याप याबाबत निर्णय न झाल्यामुळे प्रलंबित राहिली आहे. तालुक्याच्या दक्षिण भागात बहुतांश गावे आहेत.

सदरचा तालुका सीमावर्ती भागात येत असल्यामुळे या भागात अवैध व्यवसाय व गुन्हेगारी व कर्नाटकातून येणारा अवैद्य व्यापार यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गामुळे तालुक्यातील रहदारी वाढली. सध्या असलेल्या पोलीस प्रशासनाच्या कामाचा अतिरिक्त भार पडत आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अडचण संघर्ष करावा लागत आहे सदरचे प्रस्तावित पोलीस स्टेशनला तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी निवेदनात नमूद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT