Crime News esakal
सोलापूर

नवविवाहितेने राहत्या घरात साडीच्या साह्याने संपवले जीवन; नवऱ्याने पत्नीला हाक मारली, पण..

मृत संध्या हिचा विवाह (Marriage) वर्षभरापूर्वी सावळेश्वर येथील महेश उराडे यांच्या बरोबर झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

दुपारी साडेबारा वाजता महेशने संध्या हिला जेवायला बोलाविले. मात्र, तिने मी नंतर जेवायला येते असे सांगितले.

मोहोळ : एका नवविवाहितेने राहत्या घराच्या पत्र्याच्या पाईपला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याची घटना सावळेश्वर (ता. मोहोळ) येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. संध्या महेश उराडे (वय 20) रा. सावळेश्वर असे गळफास घेतलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत संध्या हिचा विवाह (Marriage) वर्षभरापूर्वी सावळेश्वर येथील महेश उराडे यांच्या बरोबर झाला होता. महेश हा बांधकाम मजूर म्हणून काम करतो. मंगळवारी महेश व पत्नी संध्या हे घराच्या वरच्या मजल्यावर गप्पा मारत बसले होते. दुपारी साडेबारा वाजता महेशने संध्या हिला जेवायला बोलाविले. मात्र, तिने मी नंतर जेवायला येते असे सांगितले.

त्यावेळी महेश हा घराच्या खालच्या खोलीत आला व जेवण करून पुन्हा पत्नीकडे गेला. त्यावेळी पत्नीने घराला आतून कडी लावली होती. तिला हाका मारल्या, परंतु आतून काहीच प्रतिसाद आला नाही. ही हकीकत महेशने वडिलांना सांगितली. वडिलांनीही येऊन हाका मारल्या, परंतु त्यांनाही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे वडिलांनी दरवाजाला जोराचा धक्का दिला, त्यावेळी दरवाजा कडी कोंड्यातून निसटून उघडला गेला. दोघांनी आत जाऊन पाहिले असता, सध्या हिने साडीच्या साह्याने घराच्या लोखंडी पाईपला गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेबाबत महेश कालिदास उराडे याने मोहोळ पोलिसात (Mohol Police) खबर दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अंजना फाळके करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT