Sangola Crime sakal
सोलापूर

Sangola Crime : डोक्यात दगड घालून सेंट्रींग कामगाराचा खून; अल्पवयीन मुलासह तिघांना घेतले ताब्यात

सेंट्रींग कामगाराचा डोक्यात दगड घालून केलेल्या खुनाचा तपास सांगोला पोलिसांनी 24 तासातच उलगडला.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला - सेंट्रींग कामगाराचा डोक्यात दगड घालून केलेल्या खुनाचा तपास सांगोला पोलिसांनी 24 तासातच उलगडला. किरकोळ कारणावरून हा खून झाला असून यामध्ये एका अल्पवयीन मुलासह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

अज्ञात कारणावरून सांगोला येथील बायपास रोडच्या पश्चिम बाजूस संतोष जगन्नाथ साळुंखे (रा. सांगोला) यांचा डोक्यात दगड घालून झाला होता. ही घटना 19 जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली होती.

याबाबतची फिर्याद खून झालेल्या व्यक्तीची मुलगी अश्विनी संदेश निकम यांनी सांगोला पोलीसात दिली होती. घटनास्थळी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड व पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी भेट देऊन तपासाची चक्रे सुरू केली. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी या तपासासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चार टीम बनवून तपास सुरू केला.

परंतु या गुन्ह्यामध्ये घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा पुरावा नसल्याने तपास कठीण होता. गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तांत्रिक व विशेष गोपनीय माहिती काढून यामध्ये तीन जणांना ताब्यात घेतले. यामध्ये एक जण हा अल्पवयीन असून त्याला सोलापूर येथे बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यातील सुनील समाधान मस्के (वय 19) व अजय शिवाजी राऊत (वय 18, दोघे राहणार संजय नगर झोपडपट्टी, सांगोला) यांना अटक करण्यात आली आहे.

या खुनाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, कल्याण ढवळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा पवार, दत्ता वंजाळे, वाकीटोळ, पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, गणेश मेटकरी, तुकाराम व्हरे, नागेश निंबाळकर व पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत सावंत यांनी केला आहे.

घटनास्थळी पुरावा नसताना तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे खुनाचा उलगडा होऊ शकला. किरकोळ कारणावरून झालेल्या खुनाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी 24 तासातच बजावल्याने मला याचा अभिमान आहे.

- अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, सांगोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT