Patil_Deshmukh 
सोलापूर

सांगोल्यात आजी-माजी आमदारांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण ! महाविकास आघाडीत होणार का शेकाप सामील?

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेतल्याचे सांगितले जात असले, तरी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. राज्याप्रमाणेच सांगोल्यातही शेकाप महाविकास आघाडीत सामील होणार का, असा प्रश्न या भेटीने उपस्थित होत आहे. 

दोनच दिवसांपूर्वी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, कॉंग्रेसचे पी. सी. झपके यांच्यामध्ये आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा झाली होती. ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढविण्याबाबत ठरल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोनच दिवसांनंतर गुरुवारी (ता. 25) शहाजीबापू पाटील हे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटले. या वेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ होते. ही बैठक झाल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांच्या वेगवेगळ्या कमेंट येऊ लागल्या. त्यामुळे ही नेमकी भेट प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती की अजून नवीन राजकीय समीकरणे बांधण्यासाठी होती? याबाबत सर्वत्र चर्चा रंगत असताना, भेटीचे नेमके कारण मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. 

सांगोल्यात महाविकास आघाडीत शेकापही? 
राज्यात महाविकास आघाडीमध्ये शेकापही आहे. सांगोल्यातील स्थानिक राजकारणामुळे सध्या शेकाप व महाविकास आघाडी वेगळी असल्याचे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून दिसून येते. परंतु, येणाऱ्या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याप्रमाणेच सांगोल्यातही शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येतील का, असा प्रश्न या आजा-माजी आमदारांच्या भेटीमुळे समोर येत आहे. 

आमची भेट ही फक्त आबासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच होती. परंतु राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शेकाप सांगोल्यातही महाविकास आघाडीत सामील होत असल्यास त्यांचे योग्य सन्मान देऊन स्वागत केले जाईल. तसे होत असल्यास सर्व घटक पक्षांना एकत्रित आणण्यात मी पुढाकार घेईन 
- शहाजीबापू पाटील, 
आमदार, सांगोला 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT