Sangola Constituency Vidhansabha Election esakal
सोलापूर

विधानसभेला आमदार शहाजीबापूंच्या अडचणी वाढणार; 'या' नेत्यानं थोपटलं दंड, सांगोल्यात महायुतीत बिघाडी?

Vidhansabha Election : महायुतीमध्ये सांगोल्याची (Sangola Constituency) जागा शिवसेनेकडे आहे. येथून पुन्हा शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

भारत नागणे

‌साळुंखे यांची उमेदवारी कायम राहिली तर शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पंढरपूर : सोलापूरच्या सांगोल्यात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. त्यामुळे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महायुतीमध्ये सांगोल्याची (Sangola Constituency) जागा शिवसेनेकडे आहे. येथून पुन्हा शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. मागील सहा महिन्यांपासून दीपक साळुंखे यांनी मतदारसंघात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

मैत्रीखातर साळुंखेंनी शहाजी बापूंना केली होती मदत

2019 च्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांनी पक्षादेश झुगारून मैत्री खातर दीपक साळुंखे यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांना मदत केली होती. त्यांच्या मदतीमुळे आमदार शहाजी पाटील केवळ सातशे मतांच्या फरकांनी निवडून आले. मागील निवडणुकीत केलेल्या मदतीची परत फेड म्हणून यावेळी शहाजी पाटील यांनी आपणाला मदत करावी‌, अशी अपेक्षा साळुंखे यांनी वारंवार व्यक्त केली आहे. परंतु, आमदार शहाजी पाटील दीपक साळुंखे यांना मदत करतील अशी शक्यता फारच कमी आहे.

महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता

साळुंखे यांची तयारी पाहता ते यावेळी निवडणूक लढतील, अशी शक्यता आहे. निवडणुकीच्या निमित्ताने दीपक साळुंखे यांनी मतदारसंघात गावभेट दौरा करून लोकांची मतं ही जाणून घेतली आहेत. अलिकडेच कोलकत्ता आणि मुंबई येथील‌ गलाई कमगारांचा मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीत मदत करण्याचे आवाहन केले आहे. महिला मेळावा घेऊन मतदार संघात वातावरण निर्मिती केली आहे. साळुंखे यांची तयारी पाहता महायुतीत बिघाडी होण्याची अधिक शक्यता आहे.

शहाजी बापूंच्या अडचणी वाढणार

‌साळुंखे यांची उमेदवारी कायम राहिली तर शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमदार शहाजी पाटील दीपक साळुंखे यांची बंडाळी कशी थोपवू शकतात यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. साळुंखे यांनी बंडाळी केली, तर आमदार शहाजी पाटील यंदा गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT