police
police sakal
सोलापूर

Sangola News : टायर गोदाम स्फोट प्रकरणाचा छडा लावण्यात सांगोला पोलिसांना यश; विमा रक्कम मिळवण्यासाठी रचला कट

उमेश महाजन

महूद - सांगोला तालुक्यातील महूद येथे टायरच्या गोदामात स्फोट होऊन लागलेल्या आगीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे. जागा मालकासह टायर दुकानदाराने विमा कंपनीची दोन कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक करून आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने हे कट कारस्थान रचल्याचे निष्पन्न झाले आहे.यामध्ये टायर गोदामाला आग लावण्यासाठी त्यांनी प्लास्टिक सोल्युशन व पेट्रोलचा वापर केला आहे.या प्रकरणात सांगोला तालुक्यातील एकासह सांगली जिल्ह्यातील तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील मुख्य सुत्रधार नितीन नरळे हा फरार आहे.

महूद-दिघंची रस्त्यालगत लक्ष्मीनगर(ता. सांगोला) येथील नितीन पांडुरंग नरळे यांच्या मालकीची इमारत आहे. या इमारतीमध्ये विठलापूर ता.आटपाडी जि.सांगली येथील रामेश्वर दत्तात्रय बाड यांचे टायरचे गोदाम होते.या गोदामात शुक्रवार(ता.१) रोजी पहाटे एक वाजून २१ मिनिटाचे सुमारास अतिशय मोठा स्फोटासारखा आवाज होऊन आग लागली होती.

या स्फोटात रामेश्वर बाड याचा चुलत भाऊ अतुल आत्माराम बाड (वय २७,रा.विठलापूर,ता.आटपाडी जि. सांगली)हा डोक्याची कवटी फुटून जागीच मरण पावला होता.तर रामेश्वर बाड यांचा मेहुणा दीपक कुटे(रा. शिवापुरी जि.सांगली) हा होरपळून गंभीर जखमी झाला आहे. दीपक कुटे याच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांनी केलेल्या तपासानुसार पुढील माहिती उघड झाली आहे.जागा मालक नितीन नरळे यांच्या मालकीच्या जागेतील गोदाम इमारतीचा ८० लाख रकमेचा विमा काढला होता. तसेच त्याच जागेत टायरचे गोदाम असणारा भाडेकरू रामेश्वर दत्तात्रय बाड याने या जागेतील मालाचा एक कोटी ६५ लाख रकमेचा विमा काढला होता.

या विमा रकमेचा सामुहिक आर्थिक लाभ घेण्याच्या उद्देशाने मुख्य सूत्रधार नितीन नरळे तसेच रामेश्वर बाड यांनी दीपक कुटे व अतुल बाड यांना आपल्या कटात सामावून घेतले. त्यांना विम्याच्या रकमेचे हिस्से वाटे करून आर्थिक लाभ करण्याच्या उद्देशाने टायर गोदामातील चांगले टायर काढून खराब टायरवर त्यांनी प्लास्टिक सोलुशन व पेट्रोल टाकून आग लावली. त्यावेळी पळून जात असताना झालेल्या आगीच्या भडकल्यानंतरच्या स्फोटात अतुल बाड हा कवठी फुटून जागीच मरण पावला. तर दीपक कुटे हा होरपळून गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नितीन पांडुरंग नरळे (लक्ष्मीनगर, ता. सांगोला) हा निष्पन्न झाला आहे.तो सध्या फरार आहे. त्याला अटक करून पुढील तपास सुरू आहे.या स्फोट प्रकरणात नितीन नरळे, रामेश्वर बाड, अतुल बा, दीपक कुटे यांच्यावर कटकारस्थान करून विमा कंपनीची फसवणूक करून आर्थिक लाभ घेण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. राजुलवार, पवन मोरे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हा तपास केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT