dr. ganpatrao deshmukh sakal
सोलापूर

Sangola News : शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार एकाच व्यासपीठावर

पुणे येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानंतर शरद पवार व देवेंद्र फडणवीस सांगोल्यात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला - सांगोल्यात स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळ्यासाठी रविवार (ता. 13) रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याच कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे रविवारी (ता. 13) रोजी स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांचे महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या स्मारकाचे अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळ्यासाठीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानंतर शरद पवार व देवेंद्र फडणवीस सांगोल्यात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, राम शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, आमदार बबनराव शिंदे.

आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार अनिल बाबर, आमदार संजय शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार यशवंत माने, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, नरसय्या आडम, राजेंद्र देशमुख, दिलीप माने, वैभव नायकवडी, शिवाजीराव काळूंगे, बाबुराव गुरव, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

स्व. गणपतराव देशमुख यांचे स्मारक -

महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्मारकाचे वजन 600 किलो असून ते संपूर्ण ब्रांज धातूपासून बनवले आहे. स्मारकाची उंची साडेआठ फूट असून त्याची उभारणी गजानन सलगर (मिरज) यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब?

Mumbai News : अंधेरी स्थानकातच तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न? वृ्द्ध करत होता प्रार्थना; प्रवाशानं शूट केला व्हिडीओ

Latest Marathi News Update LIVE : पंतप्रधान मोदींचे स्टेजवर आगमन, नितीश कुमारांची घेतली भेट

Bharatbhushan Kshirsagar: बीडचे शरद पवार! कोण आहेत भारतभूषण क्षीरसागर? ऐन निवडणुकीत त्यांची एवढी चर्चा का होतेय?

माधुरी दीक्षितचा नवा अंदाज, 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये दिसणार धकधक गर्ल, साकारणार सीरियल किलरची भूमिका

SCROLL FOR NEXT