Sangola tehsil office seven corona infected 
सोलापूर

सांगोला तहसील कार्यालयातील सातजण कोरोनाबाधित; प्रांताधिकारी, तहसीलदार होम क्वारंटाइन 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला तहसील कार्यालयाच्या विविध विभागातील सात अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने सांगोल्याचे तहसीलदार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी होम क्वॉरंटाईन झाले आहेत. तालुक्‍यात आज सर्वाधिक 78 जण पॉझिटिव्ह आले असून एकूण रुग्णांची संख्या 1197 झाली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. 
तालुक्‍यात आज 451 रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 78 जणांच्या पॉझिटिव्ह व 373 जणांचे निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सांगोला शहर 21, यलमार मंगेवाडी सहा, वाढेगाव दोन, वाकी शिवणे दोन, महूद 17, राजुरी तीन, पारे चार, जवळा दहा पाचेगाव खु. दोन तर वाणी चिंचाळे, मेडशिंगी, राजापूर, आलेगाव, कोळा, अकोला, देवळे, चिणके, नाझरे व डिकसळ येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज 17 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून आजअखेर 682 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदय भोसले यांनी दिली. उद्यापासून (ता. 15) पासून सांगोल्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे दहा दिवसाचा कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सध्या नगरपालिका, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतु कार्यालय अशा विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. 
मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले हे शासकीय कामकाजानिमित्त सांगोला येथे आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत पॉझिटिव्ह अधिकाऱ्यांचा त्यांचा संपर्क झाला असल्याने सध्या तेही सध्या होम क्वॉरंटाईन झाले आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT