Murder sakal
सोलापूर

Sangola Crime : प्रेमातून संतप्त झालेल्या प्रियकराने लग्नास नकार दिल्याने केला तरुणीचा खून

लग्न करण्यास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून संतप्त झालेल्या प्रियकराने तिचा खून केल्याची घटना इराचीवाडी, कोळा (ता. सांगोला) येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

सांगोला - लग्न करण्यास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून संतप्त झालेल्या प्रियकराने अज्ञात हत्याराने तरुणीच्या गळ्यावर, डोक्यात, हातावर वार करून तिचा खून केल्याची घटना इराचीवाडी, कोळा (ता. सांगोला) येथे शनिवारी (ता. १६) सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. ऋतुजा दादासाहेब मदने (रा. इराचीवाडी, कोळा, ता. सांगोला) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

याबाबत मृत तरुणीचे मामा पांडुरंग दाजीराम सरगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन मारुती गडदे (रा. गौडवाडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पांडुरंग सरगर यांची बहीण सावित्रीबाई दादासाहेब मदने ही तिच्या कुटुंबासह राहात असून, तिचे पती दादासाहेब शिवाजी मदने हे जन्मापासून मूकबधिर व पायाने अपंग आहेत.

तसेच सावित्रीबाई ही एका पायाने अपंग आहे. फिर्यादीची भाची ऋतुजा मदने (वय १८) हिचा विवाह कोळा येथील समाधान कोळेकर याच्याबरोबर अडीच वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर ऋतुजा व समाधान कोळेकर याचा कोर्टातून घस्टफोट झाला. ऋतुजा ही आई- वडिलांसोबत राहात असून महाविद्यालयीन शिक्षण घेत होती.

दरम्यान, ऋतुजाचे लग्न होण्यापूर्वी गौडवाडी येथील सचिन मारुती गडदे याने तिचे लग्न होऊ न देण्याचा प्रयत्न केला होता. माझ्याबरोबर लग्न झाले पाहिजे, असे म्हणाला होता. दरम्यान, ऋतुजाचा घटस्फोट झाल्यानंतर सचिन हा तिच्या संपर्कात आला होता. ते दोघेजण एकमेकांना भेटत असताना लग्न करण्यासाठी सचिन दबाव टाकत होता.

सुरवातीला ऋतुजा ही सचिनसोबत लग्नाला तयार होती; परंतु घरच्यांनी लग्न थांबवले होते. एक महिन्यापूर्वी सचिनने फिर्यादी पांडुरंग सरगर यांची भेट घेऊन, ऋतुजाचे एका मुलासोबत संबंध असून ते पळून जाऊन लग्न करणार असल्याचे सांगितले.

त्याने त्या मुलाचे आणि ऋतुजा यांचे मोबाईलमधील फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग दाखवले होते. ती माझी झाली नाही तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणून ऋतुजा ही लग्नास तयार नसल्याने सचिन तिच्यावर चिडून होता.

दरम्यान, शनिवारी (ता. १६) सायंकाळी सातच्या सुमारास ऋतुजाची आई सावित्रीबाई मदने या दूध घालण्यासाठी डेअरीवर गेल्यावर उशिराने परत येतात. तर वडील दादासाहेब मदने हे मूकबधीर आहेत. त्यावेळी ऋतुजा ही घरी एकटीच असल्याची संधी साधून सचिन गडदे (रा. गौडवाडी, ता. सांगोला) याने कोणत्यातरी घातक हत्याराने ऋतुजाच्या गळ्यावर, डोक्यात व हातावर वार करून तिला गंभीर जखमी करून तिचा खून केला, अशी फिर्याद मृत ऋतुजाचे मामा पांडुरंग सरगर यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात तपास करीत आहेत.

घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांची भेट

खुनाची घटना पोलिसांना समजताच सांगोल्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन खुनाबाबत तपासाच्या सूचना दिल्या. संशयित आरोपी फरार झाला आहे. लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT