prathmik shikshanprathmik shikshan 
सोलापूर

सांगोला तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांची सेवा पुस्तके अद्यावत करणार

उमेश महाजन

महूद (सोलापूर) : सांगोला पंचायत समितीकडे मार्च 1996 मध्ये नियुक्त प्राथमिक शिक्षकांची चुकीच्या वेतननिश्‍चितीमुळे पगारातून कपात करण्यात आली होती. त्या कपात रकमेची मागणी तातडीने करणार व प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगोल्याचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव यांनी सांगितलेआहे. 

सांगोला तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न व मागण्याबाबत तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकारी सोबत नुकतीच बैठक झाली. या बैठकीत सहावा व सातवा वेतन आयोग सेवापुस्तक पडताळणीसाठी कॅम्प लावणेबाबत. दुबार सेवापुस्तके भरण्यासाठी केंद्रनिहाय कॅम्प लावावेत. मार्च 1996 ला नियुक्त शिक्षकांची चुकीच्या वेतन निश्‍चितीमुळे कपात केलेली वेतन वसुली परत मिळणेबाबत. सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते खात्यावर जमा नाहीत, ते जमा व्हावेत. 2005 पूर्वी नेमणूक असलेल्या शिक्षकांचे 6 व्या वेतन आयोगाचे हप्ते संबंधिताच्या भ.नि.नी.खात्यात जमा करावेत.

मंजूर वैद्यकीय देयके व इतर मंजूर वेतनासाठी अनुदान मागणी तात्काळ करावी. 67 शिक्षकांना मंजूर चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीचा वेतन फरकाच्या रकमेचे मागणी करावी. 12 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूरीसाठी त्रुटींची पूर्तता करून वरिष्ठ कार्यालयास तात्काळ सादर करावेत. 24 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे निवड वेतनश्रेणी प्रस्ताव पाठवावेत. स्थायित्व लाभ आदेशाची नोंद सेवापुस्तकात घेण्यात यावी. मराठी/हिंदी भाषा सूट याबाबत सेवापुस्तकात नोंदी घेणेबाबत, थकीत शालेय पोषण आहार इंधन व स्वयंपाकी मानधन बिल मिळणेबाबत. आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव मागणी करणेबाबत व आदी प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

यावेळी शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले, जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, जिल्हा सल्लागार मुरलीधर गोडसे, शिक्षक नेते एकनाथ जावीर, विष्णू कोळी, तालुकाध्यक्ष भारत लवटे, शहराध्यक्ष हमजू मुलाणी, सरचिटणीस भागवत भाटेकर, कार्याध्यक्ष मनोहर बंदवडे, जिल्हा सोसायटीचे माजी संचालक पतंगराव बाबर, बशीर मुलाणी, तालुका सोसायटीचे माजी उपाध्यक्ष राहुल चंदनशिवे, केंद्रसंघटक दत्तात्रय इंगोले, पांडुरंग नवले, विजयसिंह घाडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

सांगोला येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी  प्रकाश यादव म्हणाले, तालुक्‍यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची सेवापुस्तके अद्ययावत करून पडताळणी करून घेणार आहे. तसेच दुबार सेवापुस्तकेही देणार आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT