Sanjay Raut from Chikhalthan has grown a lot of cabbage in 50 days 
सोलापूर

चिखलठाण येथील शेतकऱ्याने खोडव्या ऊसात घेतले कोबीचे भरघोस उत्पादन

गजेंद्र पोळ

चिखलठाण (सोलापूर) : चिखलठाण तालुका करमाळा येथील संजय राऊत यांनी आपल्या पाच एकर खोडव्या ऊसात ५० दिवसात कोबीच्या आंतरपीकापासून भरघोस उत्पादन घेतले. यापासून पाच ते सात लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. करमाळा पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक कार्यरत असणारे सध्या केडगाव गावाची जबाबदारी सांभाळणारे संजय राऊत यांनी चिखलठाण येथील आपल्या शेतामध्ये आजपर्यंत विविध पिके घेऊन नवनवीन प्रयोग केलेले आहेत. अत्यंत  प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन नोकरी मिळवण्यात ते यशस्वी झाले असले तरी त्यांनी भोगलेल्या परिस्थितीची जाणीव ठेऊन शेतीशी जुळलेली नाळ कायम ठेवली आहे.

आपल्या शेती करत असलेल्या भावासह सर्व कुटुंब एकत्र ठेवण्यातही ते यशस्वी झाले आहेत. आपली नोकरी सांभाळून उरलेल्या वेळात ते आपल्या शेतीमध्येच असतात. आजपर्यंत ऊस, कांदा, मका, बीट पिकांमध्ये भरघोस उत्पादन मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांचा पाच एकर 265 जातीचा ऊस डिसेंबर महिन्यात कारखान्याला गाळपासाठी गेला. ऊस पिकाचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी या पाच एकर खोडवा ऊसामध्ये फुल कोबीचे आंतरपीक घेतले आहे. ऊसतोडणी झाल्यानंतर आंतरमशागत करून माढा तालुक्यातील पेनूरकर नर्सरीमधून ५० हजार कोबीची रोपे विकत घेऊन ऊसात जानेवारी महिन्यात आंतरपीक म्हणून दोन फूट अंतरावर लागवड केली. यासाठी आतापर्यंत ६० ते ७० हजार रुपये खर्च झाला आहे.

यासाठी विशेष काही प्रयत्न न करता ऊसपिकासाठी नियमितपणे करावी लागणारी खुरपणी, खते व इतर मशागत केली. ठिबकद्वारे पाणी देऊन ५० दिवसात कोबीचे भरघोस पिक उभे केले आहे. योग्य दर मिळाला तर ठिक नाहीतर हे पिकच जागेवर गाडून त्याचे खत करण्याचे नियोजन होते परंतु सध्या एक ते दीड किलो वजनाचा माल तयार झाला असून सात ते दहा रुपये किलोप्रमाणे दर मिळाला तरी पाच ते सात लाख रुपये उत्पन्न सहज मिळणार आहे. राऊत यांचा ऊसातील आंतरपीकाचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असून अनेक शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेताना दिसत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chadchan Crime Six Killed Land Dispute : महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर जमिनीच्या वादातून हत्याकांड, सहा जणांची धारधार शस्त्रांनी हल्ल्यानंतर गोळ्या घालून निर्घृण हत्या

Latest Marathi Update Live: विदर्भातील पाचही विधान परिषद जागांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी

Travels Bike Accident : खासगी ट्रॅव्हल्सची दुचाकीस धडक; चार तरुणांचा जागीच मृत्यू

Sai Sudharsan Hit Wicket: साई सुदर्शनची बॅट पुन्हा स्टम्पवर पडली, शुभमनने डोक्यावर हात मारला; विचित्र विकेटचा Video Viral

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३० मे २०२६ ते ५ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT