Sanjeevani Deshpande esakal
सोलापूर

Solapur : गतीमंद मुलांसाठी संजीवनी देशपांडेंचा मोठा त्याग; लग्न न करता आयुष्य लावलं पणाला..

स्वतः काही तरी वेगळे करायचे हे ध्येय डोळ्यात असताना त्यांनी विवाह करायला नको हा निर्णय घेतला.

सकाळ डिजिटल टीम

संजीवनी देशपांडे यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर गतिमंद मुलांच्या शिक्षणासाठी विशेष अभ्यासक्रम करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मुंबई गाठली.

सोलापूर : ज्या मुलांचे काय करावे हे पालकांना समजत नाही. या मुलांना स्वतःच्या जीवनाचे काही ठरवता येत नाही. असहाय स्थितीत त्यांच्या आयुष्यात आशेचा दीप लावण्याचे मिशन समोर ठेवून संजीवनी देशपांडे (Sanjeevani Deshpande) यांनी गतीमंद मुलांसाठी (Mentally Retarded Children) नेमके कशा पद्धतीने स्वावलंबनाचा मार्ग शोधता येईल याचा शोध घेत शेकडो विशेष मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपल्या वेगळ्या कार्याची पायवाट तयार केली.

त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर गतिमंद मुलांच्या शिक्षणासाठी विशेष अभ्यासक्रम करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत प्रशिक्षणात त्यांना या मुलांना नेमकी कशी वागणूक द्यायची. त्यांच्याकडून अचूक कृती करून घेण्याचे शिक्षण मिळाले. ज्यांचा आयक्यू ५० च्या वर आहे अशा मुलांना निश्चितपणे घडवता येते हे त्यांनी समजून घेतले.

मुलांची समज व कृतीचा ताळमेळ घालून त्यांना वस्तूंची निर्मिती करता येते. या पद्धतीने अनेक वस्तू तयार करून त्यांना स्वावलंबनाकडे नेण्याचे कार्य त्यांनी जिव्हाळा मतीमंद विद्यालयाच्या माध्यमातून सुरू केले. मुलांना घडवण्यात त्यांनी घेतलल्या परिश्रमाचे फळ मिळू लागले. फाईल तयार करणे, पणत्या तयार करणे अशी कामे मुले करू लागली. काही मुलांना त्यांनी हे शिक्षण दिल्यानंतर ही मुले घरी जाऊन स्वावलंबी जीवन जगत आहेत.

त्यादरम्यान, त्यांना रोटरी स्वगती शिक्षण शाळेने पाचारण केले. रेडक्रॉस या जागतिक संघटनेच्या मदतीने या शाळेत कार्य सुरू झाले. तब्बल १४ वर्षे त्यांनी या विशेष मुलांच्या शिक्षणात कार्य केले. ही मुले चांगल्या पद्धतीने कुटुंबियासमवेत कष्ट करून जगू शकतात ही उदाहरणे त्यांनी पाहिली नाही तर घडवली. या मुलांचे गतिमंदपणा मेंदूच्या आजारामुळे आलेला असतो. या मुलांच्या समवेत काम करत त्यांनी याच मुलांच्या स्वावलंबनाला सर्वस्वी वाहून घेतले.

मिशनसमोर विवाह नाकारला

स्वतः काही तरी वेगळे करायचे हे ध्येय डोळ्यात असताना त्यांनी विवाह करायला नको हा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी हे कार्याला वाहून घेतले. कोणताही सांसारिक अडथळा नसल्याने हे कार्य अव्याहतपणे सुरू राहिले. त्यांच्या कुटुंबियांनी केवळ निर्णय मान्य केला नाही तर त्यांच्या मागे पाठबळ उभे केले. आज त्यांचे विदेशात असलेले भाचे त्यांच्या सर्व आर्थिक गरजा भागवत त्यांना स्थानिक नातेवाईकाप्रमाणे मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT